ॲमेझॉन थिंक बिग सायन्स कार्निव्हलला उत्स्फूर्त प्रतिसाद
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 09, 2026
- 29
नवी मुंबई ः वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटर येथे शुक्रवारी (6 मार्च) आयोजित करण्यात आलेल्या 7 व्या ॲमेझॉन थिंक बिग सायन्स कार्निव्हलला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ॲमेझॉनच्या सहकार्याने आणि लर्निंग लिंक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून राबवण्यात आलेला हा उपक्रम भारत सरकारच्या विकसित भारत 2047 या संकल्पनेशी सुसंगत आहे. या कार्निव्हलने विद्यार्थ्यांना विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने वास्तविक जगातील पर्यावरणीय आणि सामाजिक आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
पाच महिन्यांच्या कालावधीत तीन टप्प्यांत राबवलेल्या या कार्निव्हलमध्ये नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमधील 12 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचा समारोप एका भव्य महाअंतिम सोहळ्याने झाला, जिथे निवडक तरुण नवोन्मेषकांनी त्यांच्या कल्पना आणि कार्यरत प्रकल्प सादर केले. शाश्वततेसाठी स्टेम आणि लोककल्याणासाठी तंत्रज्ञान अशा संकल्पनांच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा वापर सकारात्मक बदलासाठी करण्याचे प्रोत्साहन विद्यार्थ्यांना देण्यात आले.
तीन दिवस चाललेल्या मिनी सायन्स कार्निव्हलमध्ये 90 संघानी आपले प्रकल्प सादर केले. उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, सरकारी अधिकारी आणि शिक्षणतज्ज्ञांच्या सखोल मूल्यमापनानंतर, अंतिम फेरीसाठी 20 सर्वोत्तम संघांची निवड करण्यात आली. प्रकल्प सादरीकरणाव्यतिरिक्त, कार्निव्हलमध्ये स्टेम क्विझ आणि रोबो रेस यांसारख्या स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. यातून विद्यार्थ्यांची विश्लेषणात्मक विचार करण्याची क्षमता, तांत्रिक ज्ञान आणि सांघिक कार्य दिसून आले. कार्निव्हलला 2,500 हून अधिक विद्यार्थ्यांनी भेट दिली. या वेळी ॲमेझॉन फ्युचर इंजिनिअर, सीडएनएक्सटी, म्युझियम ऑफ सोल्यूशन, पाय जॅम फाऊंडेशन आणि प्लूटो ड्रोन यांसारख्या संस्थांच्या स्टॉल्सवरून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याची संधी मिळाली.े लर्निंग लिंक्स फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सी.ओ.ओ.) निखिल पिंगळे यांनी या वेळी महापालिकेच्या विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवल्याबद्दल ॲमेझॉनचे आभार मानले. त्यांनी नवी मुंबई महापालिकेच्या सहकार्याचेही कौतुक केले. ॲमेझॉनच्या डेटा सेंटर्स (एपीएसी)चे नियोजन आणि वितरण संचालक अनुराग खिलनानी यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेची या वेळी प्रशंसा केली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai