परनिका टेकचंदानीने पटकावला मिस नवी मुंबईचा मुकुट
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 10, 2026
- 24
15 वर्षांच्या गौरवशाली स्पर्धेचा भव्य ग्रँड फिनाले उत्साहात
नवी मुंबई : ग्लॅमर, आत्मविश्वास आणि महिला सशक्तीकरणाचा 15 वर्षांचा गौरवशाली प्रवास साजरा करत ‘मिस नवी मुंबई 2026’ या स्पर्धेचा भव्य ग्रँड फिनाले नुकताच वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटर येथे उत्साहात पार पडला. या विशेष पर्वात परिसरातील अनेक प्रतिभावान तरुणींनी सहभाग घेतला आणि संपूर्ण कार्यक्रमात सौंदर्य, आत्मविश्वास आणि प्रतिभेचा सुरेख संगम पाहायला मिळाला. यामध्ये परनिका टेकचंदानी विजेती ठरली असून प्रथम उपविजेती प्रीती यादव तसेच द्वितीय उपविजेती राजश्री सिंह ठरली.
यू अँड आय एंटरटेनमेंट यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेचे नेतृत्व व्यवस्थापकीय संचालक हरमीत सिंग गुप्ता आणि संचालक मनमीत सिंग गुप्ता यांनी केले. स्पर्धकांना व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविश्वास आणि मंचावरील सादरीकरणासाठी मानसशास्त्रज्ञ व सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षक इंदरप्रीत कौर (शेली) तसेच रॅम्प वॉक मार्गदर्शक सिमृती बथिजा यांनी विशेष प्रशिक्षण दिले. व्यक्तिमत्त्व, प्रतिभा, संवादकौशल्य आणि आत्मविश्वास या विविध फेऱ्यांनंतर अंतिम विजेत्यांची घोषणा करण्यात आली. मिस नवी मुंबई 2026, विजेती : परनिका टेकचंदानी, प्रथम उपविजेती प्रीती यादव तसेच द्वितीय उपविजेती राजश्री सिंह ठरली.
स्पर्धकांच्या वेगळ्या व्यक्तिमत्त्व आणि कौशल्यांचा गौरव करण्यासाठी विविध विशेष पुरस्कारही देण्यात आले. सर्वोत्कृष्ट स्मितहास्य : प्रीती यादव, सर्वोत्कृष्ट छायाचित्र व्यक्तिमत्त्व : अर्शप्रीत कौर सुरा, सर्वोत्कृष्ट रॅम्प वॉक : राशी अस्थाना, मिस कॉन्जेनिॲलिटी : राशी अस्थाना, सर्वोत्कृष्ट व्यक्तिमत्त्व : प्राजक्ता सारंगी, मिस फ्रेश फेस : दिशा बाग्रेचा, सर्वोत्कृष्ट त्वचा : जिसा साजी, सर्वोत्कृष्ट डोळे : अर्शप्रीत कौर सुरा, मिस टॅलेंट : सानिया सोनल, मिस इंटरनेट पॉप्युलर : राजश्री सिंह, मिस स्टाइल आयकॉन : राणी शिंदे, सर्वोत्कृष्ट केस : एकता विश्वकर्मा, गर्ल ऑफ द शो : राणी शिंदे या सौन्दर्यवतींना घोषित करण्यात आले.
या स्पर्धेचे निकाल प्रतिष्ठित परीक्षकांमध्ये संजिव कुमार (संचालक, एस.के. ग्रुप), अशोक मेहरा (मालक, शिकारा ग्रुप), अभिजीत आदुरकर (महाव्यवस्थापक, द रिसॉर्ट हॉटेल), रोणक विज (संचालक, रोणक ॲडव्हर्टायझिंग प्रा. लि.), रिया मेक्काटुकुलम (अभिनेत्री व मिस क्वीन ऑफ इंडिया 2021), योगिता राठोड (लिवा मिस दिवा रनर-अप 2024), तमन्ना भारत (मिस नवी मुंबई 2024 व मिस एशिया ग्लोबल 2024) आणि डॉ. शिशिर शेट्टी (संचालक, ऑन्कोलॉजी विभाग, फोर्टिस हॉस्पिटल) यांचा समावेश होता. कार्यक्रमात लोकप्रिय सन्यास बँडच्या लाइव्ह परफॉर्मन्सने प्रेक्षकांची विशेष दाद मिळवली. मनमीत सिंग यांच्या नेतृत्वाखालील या सादरीकरणाने संपूर्ण वातावरण उत्साहपूर्ण केले. गेल्या 15 वर्षांत ‘मिस नवी मुंबई’ ही स्पर्धा केवळ सौंदर्यस्पर्धा न राहता तरुणींना आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व विकास आणि समाजात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरली आहे. या मैलाचा दगड ठरलेल्या पर्वाने पुन्हा एकदा आधुनिक स्त्रीशक्तीचा गौरव साजरा केला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai