9 दिवसांत 20 कोटी 15 लाख कर जमा
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 24, 2026
- 32
नवी मुंबई ः महापालिकेने अभय योजना लागू केल्यापासून 9 दिवसांमध्ये 5,744 मालमत्ताकर थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. योजनेचा लाभ घेत भरलेल्या मालमत्ता कराची रक्कम 20 कोटी 15 लाख 12 हजार 527 रुपये एवढी आहे. ही योजना 31 मार्च 2026 रोजी, रात्री 12 पर्यंत सुरू राहणार आहे.
नवी मुंबई महापालिकेकडून मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी 10 मार्च 2026 रोजी अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक तसेच मोकळ्या जागांच्या मालमत्ता कराची थकबाकी एकरकमी भरल्यास संबंधित मालमत्ताधारकांना विलंब शुल्कावर 50 टक्के सवलत देण्यात येत आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी आर्थिक वर्ष 2025-2026 पर्यंतची संपूर्ण थकबाकी निर्दिष्ट कालावधीत एकरकमी भरणे आवश्यक असून, या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अभय योजना लागू झाल्यापासून 10 मार्च 2026 रोजी, सकाळी 10 पासून ते 18 मार्च 2026 रोजी, दुपारी 12 पर्यंत 9 दिवसांच्या काळात 5 हजार 744 मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घेत रू. 20 कोटी 15 लाख 12 हजार 527 इतकी रक्कम जमा केलेली आहे.
यामध्ये ऐरोली प्रभागातून 625 मालमत्ता धारकांनी रू. 46 लाख 49 हजार 514, बेलापूर प्रभागातून 553 मालमत्ताधारकांनी रू. 2 कोटी 61 लाख 8 हजार 781, दिघा प्रभागातून 297 मालमत्ताधारकांनी रू. 48 लाख 57 हजार 918, घणसोली प्रभागातून 1 हजार 260 मालमत्ताधारकांनी रू. 2 कोटी 88 लाख 97 हजार 868, कोपरखैरणे प्रभागातून 737 मालमत्ताधारकांनी रू. 4 कोटी 48 लाख 80 हजार 738, नेरूळ प्रभागातून 899 मालमत्ताधारकांनी रू. 5 कोटी 70 लाख 4 हजार 788, तुर्भे प्रभागातून 890 मालमत्ताधारकांनी रू. 2 कोटी 11 लाख 48 हजार 501 आणि वाशी प्रभागातील 483 मालमत्ताधारकांनी रू. 1 कोटी 39 लाख 64 हजार 419 मालमत्ताकर भरला आहे.
- ऑनलाईन कर भरण्यास मिळतेय पसंती
नवी मुंबई शहरातील मालमत्ता धारकांसाठी आठही विभाग कार्यालयांमध्ये कर संकलन केंद्रांत प्रत्यक्ष कर भरण्याची सुविधा उपलब्ध असून, त्याचसोबत नागरिकांच्या सोयीसाठी ऑनलाईन पद्धतीनेही मालमत्ता कर भरण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. या सुविधेलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील 9 दिवसांत अभय योजनेचा लाभ घेऊन मालमत्ता कर भरलेल्या 5 हजार 744 मालमत्ताधारकांपैकी जवळपास 55 टक्के म्हणजेच 3 हजार 134 मालमत्ताधारकांनी ऑनलाईन कर भरला आहे. तरी, अद्याप ज्या मालमत्ताधारकांनी कर भरलेला नाही, त्यांनी महानगरपालिकेच्या ... या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन किंवा 8291920504 द्वारे किंवा कर संकलन केंद्रात प्रत्यक्ष जाऊन आपला मालमत्ता कर भरावा.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai