संकल्प पूर्ती गुणगौरव सोहळा उत्साहात
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 10, 2026
- 30
मुंबई : आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये वीज गळती कमी करणे व देयकांची थकबाकी वसुलीसाठी विशेष प्रयत्न करून महावितरण कंपनीच्या महसूल वाढविण्याचा दृष्टीने भांडुप परिमंडलांतर्गत ज्या मंडळ/ विभाग/ उपविभागाने चांगली कामगिरी केली व महावितरणचा महसूल वाढविण्यात आपले हातभार लावले आहेत त्यांचा गुण गौरव सोहळा दि. 8 एप्रिल 2026 रोजी भांडुप येथील जैनम हॉल मध्ये आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यालयाचे कार्यकारी संचालक(2) धनंजय औंढेकर तर कार्यक्रमाचे अध्यक्ष भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता संजय पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. महावितरण ही भारतातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी असून महावितरणचा ग्राहक वर्ग खूप मोठा आहे. त्यामुळे, आपल्या ग्राहकांना दर्जेदार आणि अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी महावितरणला आर्थिक दृष्ट्या सक्षम असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी, ग्राहकांकडून त्यांनी वापरलेले वीजेचे देयक वसूल करणेही तितकेच आवश्यक आहे. म्हणून, महावितरणच्या राज्यातील प्रत्येक परिमंडलात चांगली ग्राहक सेवा देण्यावर भर देण्यासोबतच ग्राहकांकडून वीज देयक वसुली, वीज चोरी पकडण्याचे काम सतत सुरु असते. त्यामुळे, भांडुप परिमंडलांतर्गत चांगली कामगिरी करून व सर्व निकषांआधारे वाशी मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविले आहे. ठाणे मंडळाने द्वितीय तर पेण मंडळाने त्रितीय क्रमांक पटकाविले आहेत. याशिवाय, चांगली कामगिरी केल्यामुळे विभागीय कार्यालयामध्ये वाशी विभागाने प्रथम तर वागळे ईस्टेट विभागाने द्वितीय तर गोरेगाव विभागाने त्रितीय क्रमांक पटकाविले आहेत. तसेच यावेळी उपविभागाचे ही सन्मान करण्यात आले. यावेळी बोलताना, मुख्य अभियंता भांडुप परिमंडल, संजय पाटील म्हणाले कि, भांडुप परिमंडलाने केलेल्या या कामगिरीत तुमच्या सर्वांचे खूप मोठे योगदान आहे. भांडुप, राज्यातील जास्त महसुल आणणाऱ्या परिमंडलातून एक आहे. म्हणून आपली जबाबदारी खूप मोठी असते व मुख्यालयाला ही आपल्याकडून खूप अपेक्षा असतात. या वर्षी प्रत्येकाने खूप मेहनत घेतली आहे ज्यामुळे भांडुप परिमंडलाने सन 2025-26 करिता वार्षिक मागणीच्या 101% वीजबिलाची वसुली केली आहे. विशेष म्हणजे, स्मार्ट मीटर आल्यापासून आपल्याला वीज हानी कमी करण्यात खुप मदत झाली आहे. मला खात्री आहे कि, तुम्ही यापुढे ही ग्राहकांना चांगली सेवा देण्यात प्राधान्य द्याल. यावर्षी आपल्या कामाचा तुम्ही एक मापदंड निश्चित केला आहे व आता तुम्ही तुमचाच मापदंड पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे”.
कार्यकारी संचालक(2) धनंजय औंढेकर यांनी सर्व भांडुप परिमंडलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले व म्हणाले कि, टप्प्या-टप्याने काम करून पुढील आव्हांना सामोरे जावे लागणार आहे. महावितरण मध्ये सध्या आपण नवीन तंत्रज्ञानांचा मदतीने कार्यप्रणाली मध्ये खूप सकारात्मक बदल करत आहोत. माहिती तंत्रज्ञानच्या मदतीने आपण वीजचोरी पकडण्यापासून पूर्ण प्रक्रिया होईपर्यंत किंवा ग्राहकांना अलर्ट नोटीफिकॅशन देणे ही सर्व कामे प्रणाली द्वारे करण्याची तयारीत आहोत. ग्राहकांना 24 तास अखंडित वीजपुरवठा देणे अतिशय महत्वाचे आहे. म्हणून, पावसाळ्या पूर्वी देखभाल व दुरुस्तीची कामे पूर्ण करून घ्यावीत व त्याकरिता मुख्यालयातर्फे जी मदत असेल ती निश्चितच पूर्ण करण्यात येईल.
उपविभागाचे सन्मान
वाशी विभाग
1. कोपरखैरणे उपविभाग 2. पनवेल शहर उपविभाग 3. वाशी उपविभाग,
वागळे ईस्टेट विभाग
1. ईश्वरनगर उपविभाग 2. सर्वोदय उपविभाग 3. कोलशेत उपविभाग,
गोरेगाव विभाग
1. खालापूर उपविभाग 2. माणगाव उपविभाग 3. पोलादपूर उपविभाग यांना गौरविण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai