पालिका शाळेतील विद्यार्थ्याची साता समुद्रापार झेप
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 15, 2026
- 22
दहावीतील विद्यार्थी अमोघ बनसोडेची आंतरराष्ट्रीय शिबिरासाठी निवड
नवी मुंबई ः महानगरपालिका शाळा क्र.120 या शाळेचा इयत्ता दहावीतील विद्यार्थी अमोघ बनसोडे याची इंग्लड मध्ये डेव्हॉन येथे होणाऱ्या सीड्स ऑफ पीस इंटरनॅशनल कॅम्प 2026 या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर नेतृत्व, संवादकौशल्य व शांतता प्रस्थापनेविषयी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
अमोघ बनसोडे हा 18 जुलै ते 8 ऑगस्ट 2026 या कालावधीत इंग्लंड येथे आयोजित आंतरराष्ट्रीय शिबिरात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. अमोघचे हे यश नवी मुंबई महानगरपालिकेसाठी अभिमानास्पद असून, त्याच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार आहे. या कार्यक्रमासाठी देशातील 13 राज्यांमधून 300 हून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. कठोर निवड प्रक्रियेनंतर अंतिम 17 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये अमोघ बनसोडे याने स्थान मिळविले आहे. रबाळे येथे रहात असलेल्या अमोघ बनसोडेचे वडील ट्रक चालक असून त्याची आई गृहिणी आहे. त्याला दोन बहिणी असून, त्यापैकी एक इयत्ता बारावीमध्ये तर दुसरी द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. घरातील कोणीही उच्चशिक्षित नसतानाही त्याने जिद्द व मेहनतीच्या जोरावर हे उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महापौर सुजाता पाटील, आयुक्त डॉ.कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी संपादन केलेल्या यशाबद्दल अमोघचे अभिनंदन व कौतुक केले असून त्याला शुभेच्छा प्रदान केल्या आहेत.
अमोघच्या या यशात नमुंमपा शाळा क्र. 120 च्या मुख्याध्यापिका गोमती श्रीनिवासन, तसेच सहकारी शिक्षक यश पंत,नूरसबा शेख, रुथ अनूग्रह यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, अमोघच्या या यशामुळे नवी मुंबई महानगरपालिका शाळांचा गौरव वाढला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai