पुनर्वसनासाठी झोपडपट्टीधारकांची कागदपत्रे जमा
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 21, 2026
- 34
आ. मंदा म्हात्रे यांच्या पुढाकाराने झोपु प्रक्रियेला गती
नवी मुंबई : बेलापुर मतदारसंघातील झोपडपट्टीधारक नागरिकांना सन्मानाने आणि सुरक्षित निवास मिळावा यासाठी आ. मंदा म्हात्रे या प्रयत्नशील असून संबंधित प्रक्रियेला गती देण्याचे काम त्या करत आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन संदर्भात कार्यशाळा पार पडल्यानंतर अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आ.मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गौरव निवासस्थानी झोपडपट्टी धारकांची फाईल जमा करून घेण्याची प्रक्रिया सुरु झाली. यावेळी झोपडपट्टी वासियांनी 300 ते 350 कागदपत्रे जमा केली.
झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आ. मंदा म्हात्रे यांनी पुढाकार घेतला असून झोपडपट्टीधारकांना मार्गदर्शन, जनजागृती यामध्ये त्या सहकार्य करत आहेत. गत शनिवारी झोपडपट्टी पुनर्वसनासंबंधित कार्यशाळा आ. मंदा म्हात्रे यांच्या पुढाकाराने घेण्यात आली. या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. त्यानंतर अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आ.मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गौरव निवासस्थानी झोपडपट्टी धारकांची फाईल जमा करून घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. सदर बैठकीत झोपडपट्टी पुनर्वसन योजनांची सविस्तर माहिती ॲडव्हाकेट संतोष पळसकर यांनी झोपडीधारकांना दिली. तसेच पुनर्वसन प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, आवश्यक कागदपत्रे, पात्रता निकष आणि शासनाच्या धोरणांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. सदर बैठकीत स्थानिक नागरिक, झोपडपट्टीधारक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमामुळे झोपडपट्टी पुनर्वसन प्रक्रियेला गती मिळून सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या हक्काचे अंदाजे 300 चौ.फुट घर व सन 2000 पूर्वीच्या पात्र रहिवास झोपडीधारकास व वाणिज्य गाळ्यास विनामुल्य सदनिका / गाळा देण्यात येईल तसेच दि. सन 2011 पूर्वीच्या पात्र रहिवास झोपडीधारकास सशुल्क म्हणजे 2.5 लक्ष इतकी रक्कम भरून सदनिका देण्यास मदत होणार आहे. तसेच बेलापूर मतदारसंघातील झोपडपट्टीधारक नागरिकांना सन्मानाने आणि सुरक्षित निवास मिळावा, या उद्देशाने हा पुढाकार घेण्यात आला आहे. यामुळे अनेक कुटुंबांच्या घराच्या स्वप्नाला प्रत्यक्ष आकार मिळण्यास मदत होणार असल्याचा विश्वास आमदार मंदाताई म्हात्रे यांनी व्यक्त केला. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित, सुसज्ज आणि सन्मानजनक निवास उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. तसेच पंचशील नगर बेलापूर, टाटा नगर सीबीडी बेलापूर व जय दुर्गा माता नगर सीबीडी या झोपडपट्टी वासियांनी आज 300 ते 350 कागदपत्रे जमा केली. येणाऱ्या काही काळातच झोपडपट्टी धारकांना आपल्या हक्काचा घर मिळणार असल्याने झोपडीधारकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आमदार मंदाताई म्हात्रे यांचे झोपडीधारक यांनी मनपूर्वक आभार व्यक्त केले. यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत ॲडव्हाकेट संतोष पळसकर, समाजसेविका ज्योती पाटील, समाजसेवक प्रवीण भगत, प्रभाकर कांबळे, तसेच असंख्य झोपडीधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai