तीन रेल्वे स्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे हस्तांतरीत
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 24, 2026
- 23
नवी मुंबई ः नवी मुंबईतील रेल्वे पायाभूत सुविधांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सिडकोने उरण रेल्वे मार्गावरील तरघर, बामणडोंगरी आणि खारकोपर ही तीन रेल्वे स्थानके तसेच संबंधित रेल्वे पायाभूत सुविधा औपचारिकरित्या मध्य रेल्वेकडे हस्तांतरित केली आहेत.
रेल्वे समन्वय समितीचे सदस्य तथा खासदार यांच्या प्रमुख उपस्थितीत सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांनी हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक. तसेच सिडको आणि मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या उभारणीत सिडकोने महत्त्वपूर्ण योगदान दिले असून, स्थानके आणि संबंधित पायाभूत सुविधांचे मध्य रेल्वेकडे हस्तांतरण हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे अश्विन मुद्गल यांनी सांगितले. यामुळे स्थानकांचे व्यवस्थापन आणि सेवा अधिक कार्यक्षमपणे राबविण्यास मदत होणार आहे.
या हस्तांतरणामध्ये स्थानक इमारती, फोरकोर्ट, प्रवासी वाहनतळ, विद्युत उपकेंद्रे, दूरसंचार यंत्रणा तसेच इतर आवश्यक पायाभूत सुविधांचा समावेश आहे. यापुढे या स्थानकांचे संचालन, देखभाल, प्रवासी सुरक्षा आणि सेवा व्यवस्थापनाची जबाबदारी मध्य रेल्वेकडे राहणार आहे. नवी मुंबईच्या वाढत्या रेल्वे नेटवर्कच्या दृष्टीने हे हस्तांतरण महत्त्वाचे मानले जात असून, प्रवाशांना अधिक दर्जेदार आणि सुस्थित सेवा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai