मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे प्रशिक्षण
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 24, 2026
- 26
नवीमुंबई ः महाराष्ट्र राज्यात मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम 2026 जाहीर करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे मतदारांच्या मतदारांना घरोघरी भेट देणार आहेत. सदर प्रक्रिया 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
या गृहभेटीमध्ये 150 ऐरोली व 151 बेलापूर विधानसभा मतदार संघातील मतदारांना गणना पत्र वाटप करण्यात येणार आहे. ज्या मतदारांचे नाव सन 2002 च्या मतदार यादीत आहे, त्यांनी त्यांच्या स्वतःशी व त्यांच्या मतदार पाल्यांशी मॅपींग करणे कामी गणनापत्रात माहिती भरून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे परत करावयाची आहे. सदर गणनापत्र कुटुंबातील सर्व मतदारांसाठी एक सज्ञान व्यक्तीही स्वीकारू शकतात व भरून स्वाक्षरीत करू शकतात. ज्या मतदारांचे नाव सन 2002, 2003, 2004 मधील मतदार यादीशी मॅचिंग होऊ शकत नाही, त्यांनाही गणना पत्र भरून देण्याची मुभा आहे. ज्या मतदारांचे गणना पत्र भरून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना प्राप्त होतील, त्यांची नावे प्रारूप यादीत समाविष्ट होणार आहेत. हे काम नियोजनबध्द रितीने व काटेकोटरपणे व्हावे यादृष्टीने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक व क्षेत्रीय अधिकारी यांचे प्रशिक्षण विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी येथे आयोजित करण्यात आले होते. सदर प्रशिक्षण सत्रात अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा नमुंमपा अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी मार्गदर्शन केले. गणनापत्र घेऊन आपल्या घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करावेव गणनापत्रात योग्य माहिती भरून ते त्यांच्याकडेच परत द्यावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी 150 ऐरोली विधानसभा मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकारी प्रिती पाटील व 151 बेलापूर विधानसभा मतदार संघ मतदार नोंदणी अधिकारी अश्विनी पाटील यांनी या प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai