पावसाळी कालावधीतील मदतीसाठी पालिका सज्ज
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 24, 2026
- 28
नवी मुंबई ः महानगरपालिका क्षेत्रात सोमवार दि.22 जून रोजी रात्रीपासून मोठया स्वरुपात पावसाला सुरुवात झाली असून 23 जून रोजी सकाळी 8.30 ते 24 जून रोजी सकाळी 8.30 पर्यंत सरासरी 125.23 मि.मी. पर्जन्यवृष्टी झालेली आहे. यामध्ये बेलापूर विभागात सर्वाधिक 139.40 मि.मी. तसेच दिघा विभागात सर्वात कमी 114.40 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी पावसाळी कालावधीत नमुंमपा क्षेत्रात आजतागायत एकूण 148.15 मि.मी. पर्जन्यवृष्टी झालेली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा पावसाळी मदतकार्यासाठी सज्ज असून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडून पावसाळी स्थितीचा व नवी मुंबईतील परिस्थितीचा नियमित आढावा घेतला जात आहे.
नवी मुंबई महापालिका मुख्यालयात मध्यवर्ती आपत्ती नियंत्रण कक्ष असून त्याठिकाणी अहोरात्र मनुष्यबळ व यंत्रणा दक्षतेने कार्यरत आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेच्या आठही विभाग कार्यालय क्षेत्रात चोवीस तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित आहेत. तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाचही आग्निशमन केंद्रांमध्ये तत्पर मदत कार्यासाठी कृतीदल सज्ज आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील काही भाग हा समुद्र सपाटीपासून खालच्या पातळीवर असून अशा अतिसखल भागामध्ये काही प्रमाणात पाणी साचते हे लक्षात घेऊन त्याठिकाणी पाणी उपसा पंप कार्यान्वित ठेवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे विभाग कार्यालयातील मदतकार्य पथक आपापल्या क्षेत्रात फिरुन रस्त्याच्या कडेला गटारात पाणी वाहून जाणाऱ्या वॉटर एन्ट्रीमध्ये काही अडथळे येऊन पाणी साचल्याचे निदर्शनास आल्यास त्या ठिकाणी जाऊन वॉटर एन्ट्री खुल्या करुन पाण्याचा निचरा करून देण्यासाठी वाट करुन देत आहेत. त्याचप्रमाणे वाऱ्यामुळे कुठे झाडांच्या फांद्या पडून वाहतूकीला व रहदारीला अडथळा येत असल्यास त्या ठिकाणी पोहचून फांद्या हटवून वाहतूक सुरळीत केली जात आहे.
पावसाळी कालावधीत नागरिकांना महानगरपालिकेशी संपर्क साधण्याकरिता नियंत्रण कक्षांचे संपर्कध्वनी क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.
- तात्काळ कृती केंद्र नमुंमपा मुख्यालय 27567060 / 27567061
- 1800222309 / 1800222310 (टोल फ्री क्रमांक)
- बेलापूर विभाग कार्यालय 27570610 / 27573826
- नेरुळ विभाग कार्यालय 27707669 / 27713212
- वाशी विभाग कार्यालय 27655370 / 27659741
- तुर्भे विभाग कार्यालय 27754061 / 27834069
- कोपरखैरणे विभाग कार्यालय 27542406 / 27542449
- घणसोली विभाग कार्यालय 27692489 / 27698175 / 7304045316
- ऐरोली विभाग कार्यालय 27792114 / 27567298
- दिघा विभाग कार्यालय 9136544027 / 9136594028
- अग्निशमन केंद्र सीबीडी बेलापूर 27572116 / 27572111
- अग्निशमन केंद्र नेरुळ 27707101
- अग्निशमन केंद्र वाशी 27660101 / 27894800 / 27895900
- अग्निशमन केंद्र कोपरखैरणे 27541101
- अग्निशमन केंद्र ऐरोली 27796600 / 27791108 / 27792108
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai