30 जूनपर्यंत सुट्टीच्या दिवशीही भरु शकता मालमत्ता कर
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 25, 2026
- 25
नवी मुंबई ः आर्थिक वर्ष 2026-27 चा मालमत्ता कर भरण्यासाठी 30 जून 2026 पर्यंत सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी तसेच शनिवार आणि रविवार या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीदेखील नवी मुंबई महापालिकेचे मुख्य कार्यालय तसेच शहरातील 8 विभाग कार्यालयांतील व त्या अंतर्गत असणारी इतर कर संकलन केंद्रे सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत.
नागरिकांना सुट्टीच्या दिवशी मालमत्ता कर भरता यावा, यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून 1 जुलै 2026 पासून थकीत करावर 2 टक्के विलंब शुल्क लागू होणार आहे. त्यामुळे अतिरिक्त आर्थिक भार टाळण्यासाठी नागरिकांनी महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या सुविधेचा लाभ घेत 30 जून 2026 पूर्वी मालमत्ता कर भरावा, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. नवी मुंबई महापालिकेला दि. 26 जून रोजी मोहरम, दि. 27 जून रोजी शनिवार आणि 28 जून रोजी रविवार अशा सुट्ट्या आहेत. परंतु नागरिकांच्या सुविधेसाठी या सुट्ट्यांच्या दिवशीही कर संकलन केंद्रे सुरू ठेवण्यात येणार आहेत. नोकरदार वर्गास आणि सर्वसामान्य नागरिकांना या सुविधेमुळे सुट्टीच्या दिवशीही कर भरणे सुलभ होणार आहे. तसेच कामकाजाच्या दिवशी सर्व कर संकलन केंद्रे सकाळी 10 ते संध्याकाळी 3 वाजेपर्यंत सुरू राहतील.
नवी मुंबई शहरातील मालमत्ताधारकांसाठी आठही विभाग कार्यालयांमधील कर संकलन केंद्रांत प्रत्यक्ष कर भरण्याची सुविधा उपलब्ध असून नागरिकांना घरबसल्या मालमत्ता कर भरण्यासाठी विविध ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai