सर्व झोपु योजनांच्या चौकशीची मागणी
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 03, 2026
- 16
मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास (झोपु) योजनांमध्ये बनावट नावे घुसडली जात असून सध्या सुरू असलेल्या सर्व झोपु योजनांची एसआयटीकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे चारकोप येथील आमदार योगेश सागर यांनी वधासभेत केली. पुण्यातील गोसाई वस्तीच्या झोपु योजनेत अपात्र झोपडपट्टीधारकांना घुसविण्यात आल्याचा विषय लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून मांडण्यात आला. यावेळी मुंबईत झोपु योजनेत सुरू असलेल्या घोटाळ्यांना सागर यांनी वाचा फोडली.
मुंबई, ठाणे व पुणे येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवण्यात येत असून त्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. अनेक अपात्र लाभार्थ्यांना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरुन घूसवले जात असून त्यांच्या नावावरील सदनिका बाजारात खुल्या भावाने विकल्या जात आहेत. यामध्ये स्थानिक राजकर्ते अग्रेसर असून ते आपल्या मर्जीतील विकासकाच्या नावे झोपडपट्टी पुनर्विकास योजना मंजुर करुन नंतर ती दुसऱ्या विकासकाला विकसन करारनामाद्वारे हस्तांतरीत करत आहेत. यामध्ये ते आपली टक्केवारी निश्चित करत आहेत. अशाचप्रकारे मुंबई महापालिकेच्या एका जमिनीवर अवैधपणे 188 गाळे बांधण्यात आले. त्याचे बनावट परिशिष्ट दोन बनविण्यात आले. या प्रकाराची कुणकुण लागल्यानंतर पाहणी करण्याकरिता आमदार योगेश सागर गेले असता तिथे त्यांना अटकाव करण्यात आला. अखेर पालिका आयुक्तांशी संपर्क साधला असता या ठिकाणी जाता आले, असा अनुभव सागर यांनी सांगितला. या योजनेतील बनावट परिशिष्ट आता रद्द करण्यात आले आहे. परंतु, या प्रकरणात एकाही दोषी पालिका किंवा झोपु अधिकाऱ्यावर कारवाई झालेली नाही, असा आरोपही सागर यांनी केला.
केवळ याच ठिकाणी नव्हे तर संपूर्ण मुंबईभर हा प्रकार मोकाटपणे सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईत जितके झोपु प्रकल्प सुरू आहेत, त्यांमधील झोपडपट्टीधारकांची पात्रता ज्या परिशिष्टाच्या माध्यमातून निश्चित केली जाते, त्याची चौकशी एसआयटीकडून करण्यात यावी, अशी मागणी सागर यांनी केली. संरक्षण विभागाच्या जमिनींवर झोपु योजना करता येत नाही. परंतु, या जमिनीवर राहणाऱ्या लोकांनाही झोपु योजनेत घर मिळाले पाहिजे, याबाबत राज्य सरकार काय करणार, असा प्रश्न राम कदम यांनी केला. त्यावर, संरक्षण, हवाई दलाच्या, केंद्राच्या जमिनीवरील झोपु योजनांमध्ये अडचणी येतात. त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहोत. लोकसभा अधिवेशनाच्या निमित्ताने खासदारांच्या सर्वपक्षीय बैठकीत हा विषय प्राधान्यक्रमाने घेण्याची विनंती मुख्यमंत्री कार्यालयाला करण्यात आली आहेत, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली.
- गुरचरण जमीनीवरील झोपु योजनेवर लक्षवेधी
विधानसभा सदस्य अंबादास दानवे यांनी ठाणे जिल्ह्यातील गुरचरण जमीनीवर राबवत असलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास योजनांबाबत लक्षवेधी मांडली आहे. गुरचरण/गायरान जमीनीवरील अतिक्रमणे न हटवता या जमीनीच्या महसूल नोंदी गुरचरण म्हणून हटवून तेथे महाराष्ट्र शासन अशा नोंदी बदल करुन त्यावर ठाणे जिल्ह्यात झोपु योजना राबवली जात असल्याबाबतची तकार दानवे यांनी केली आहे. गुरचरण जमीनींचे सरंक्षण करणे व सर्व संबंधित नोंद बदलांची पडताळणी करण्याची आवश्यकता असल्याची मागणी लक्षवेधी क्र. 824 अन्वये दानवे यांनी केली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai