पर्यटकांना धोकादायक पर्यटनस्थळावर बंदी
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 04, 2026
- 32
नवी मुंबई : पावसाळ्यात धबधबे, डोंगर आणि तलाव परिसरात होणारे अपघात तसेच पर्यटकांच्या बुडून होणाऱ्या मृत्यूच्या घटना रोखण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी कठोर पाउल उचलले आहे. खारघर व तळोजा परिसरातील अनेक धोकादायक पर्यटनस्थळांवर पोलिसांनी पर्यटकांच्या प्रवेशास पूर्णपणे बंदी घातली असून, ही सर्व ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी खारघर पोलिसांनी संबंधित परिसरात ठिकठिकाणी इशारा देणारे सूचना फलकही लावले आहेत.
दरवर्षी पावसाळा सुरु होताच खारघरमधील डोंगररांगा, धबधबे आणि निसर्गरम्य स्थळांवर मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील हजारो पर्यटक गर्दी करतात. मात्र, अतिउत्साह, निष्काळजीपणा आणि धोकादायक ठिकाणी प्रवेश केल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या तसेच गंभीर जखमी झाल्याच्या घटना यापुर्वी घडल्या आहेत. त्यामुळे अशा दुर्घटना रोखण्यासाठी खारघर पोलिसांनी खारघर व तळोजा परिसरातील अनेक धोकादायक पर्यटनस्थळांवर पर्यटकांच्या प्रवेशास पूर्णपणे बंदी घालुन ही सर्व ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत.
खारघर मधील पांडवकडा, चाफेवाडी, फणसवाडी, ड्रायव्हिंग रेंज (सेक्टर-5), ओवेकॅम्प धरण, तळोजा जेलसमोरील डोंगर तसेच तळोजा समोरील तलाव या परिसरात यापूर्वी अनेक गंभीर दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत खारघर व तळोजा परिसरातील धोकादायक पर्यटन स्थळांवर पर्यटकांच्या प्रवेशास पूर्णपणे बंदी घालण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जोशी यांनी सांगितले.
विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त यांच्या 25 जून 2026 रोजीच्या आदेशानुसार, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2026 च्या कलम 163 अंतर्गत ही सर्व ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रतिबंधित क्षेत्रात विनापरवाना प्रवेश करुन आदेशाचे उल्लंघन करणाऱया पर्यटकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असा स्पष्ट इशारा खारघर पोलिसांनी दिला आहे. पर्यटकांनी केवळ निसर्गाचा आनंद घेण्याच्या नादात स्वत:चा जीव धोक्यात न घालता प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे आणि सुरक्षित पावसाळी पर्यटनाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
- चौकट
प्रतिबंधित घोषित करण्यात आलेली प्रमुख ठिकाणांमध्ये पांडवकडा धबधबा परिसर, चाफेवाडी, फणसवाडी परिसर, ड्रायव्हिंग रेंज सेक्टर-5, ओवेकॅम्प धरण परिसर, तळोजा जेलसमोरील डोंगर परिसर, तळोजा समोरील तलाव या परिसराचा समावेश आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai