7036 झाडांची छाटणी
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 04, 2026
- 34
पावसाळी कालावधीत काळजी घेण्याचे आवाहन
नवी मुंबई ः महापालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत वृक्ष छाटणीचे काम दररोज युद्धपातळीवर सुरू आहे. धोकादायक वृक्षांची पाहणी करण्यात आलेली असून झाडे काढण्याचे काम प्रगतीपथावर आहे. उद्यान विभागामार्फत 8 विभाग कार्यालयात 9 वृक्ष छाटणीची वाहने असून त्यांच्यामार्फत दररोज मोठ्या प्रमाणात वृक्ष छाटणीची कामे सुरू आहेत. यामध्ये बेलापूर 1400, नेरूळ 578, तुर्भे 1159, वाशी 113, कोपरखैरणे 672, घणसोली 1014, ऐरोली 1622 व दिघा 478 अशा 8 विभाग क्षेत्रात एकूण 7036 झाडांची छाटणी करण्यात आलेली आहे.
उदयान सहाय्यक यांनी वेळोवेळी कार्यक्षेत्रात पाहणी करुन केलेल्या सर्व्हेनुसार तसेच नवी मुंबई महापालिकेमध्ये प्राप्त नगरसेवकांचे अर्ज, नागरिकांचे कॉल्स, व्हॉट्स ॲप मेसेज, ग्रिव्हिअन्स ॲप अशा विविध माध्यमांतून प्राप्त होणाऱ्या तक्रारींनुसार ठिकठिकाणी अनेक वृक्षांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आलेली आहे. याशिवाय नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सुकलेली, मृत आणि प्रथमदर्शनी धोकादायक अशी एकूण 104 झाडे आढळून आली असून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत वादळी वाऱ्यासह होणाऱ्या मुसळधार पावसामुळे सुस्थितीत असलेली झाडेदेखील उन्मळून पडण्याच्या घटना घडत आहेत. नवी मुंबईतील नागरिकांकडून याबाबत दैनंदिन तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यानुसार उन्मळून पडलेली झाडे, सोसाटयाच्या वारा-पावसामुळे पडलेल्या फांदया तत्परतेने उचलण्याबाबत अग्निशामक विभाग, घनकचरा विभाग यांच्याशी समन्वय साधुन ते तात्काळ हटवण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत नागरिकांना आवाहन करण्यात येते की, वादळी वाऱ्यासह असलेल्या पावसात झाडे पडण्याचा धोका वाढतो. त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी काळजी घ्यावी. झाडाखाली वाहन उभे करु नये, पाऊस सुरु असताना झाडाखाली उभे राहू नये, कमकुवत, झुकलेल्या झाडांपासून सुरक्षित अंतर राखाव, सोसायटीतील धोकादायक झाडांची वेळेवर छाटणी करुन घ्यावी.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai