एसआयआर संदर्भात आढावा बैठक
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 04, 2026
- 32
पनवेलः भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या मतदान विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा मतदार नोंदणी अधिकारी मंगेश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली (दि. 1 जुलै) महानगरपालिका मुख्यालयातील बैठक कक्षात महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीचाही आढावा घेण्यात आला.
या बैठकीस मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पवन चांडक, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी,उपायुक्त नानासाहेब कामठे, ,संभाजी शेलार, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, उपायुक्त प्रसेनजित कारलेकर, उपायुक्त रविकिरण घोडके, उपायुक्त स्वरूप खारगे, समीर वाठारकर, रमेश चव्हाण, मिनल भामरे महापालिका व महसूल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच इतर सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.या बैठकीत एसआयर प्रक्रियेच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना आयुक्त मंगेश चितळे यांनी बिएलओ प्रशिक्षण ॲपवर उपस्थिती नोंदविणे, रविवारी आयोजित शिबिराच्या तयारीचा आढावा, एइआरओ कार्यालयाची स्थापना, प्रलंबित नियुक्ती, तसेच नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लॉगिन तयार करण्याची कार्यवाही संदर्भात आढावा घेण्यात आला. याशिवाय शिबिराच्या प्रचार व प्रसिद्धीची तयारी, सहायक व स्वयंसेवकांची नियुक्ती, तांत्रिक प्रशिक्षणाचे नियोजन व आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीचाही आढावा घेण्यात आला. ही बैठक एसआयआर कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पवन चांडक यांनी सांगितले.
पनवेल विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राच्या ठिकाणी रविवार दिनांक 5 जुलै रोजी नागरिकांच्या सोयीसाठी विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात नागरिकांनी सहभागी व्हावे व आपले एन्युमरेशन फॉर्म भरून घेण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत व पारदर्शक करण्याच्या उद्देशाने हे विशेष पुनरीक्षण अभियान राबविण्यात येत आहे. बीएलओ यांना एन्युमरेशन फॉर्म (ईएफ फॉर्म) भरण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. तसेच जास्तीत जास्त मतदारांनी ईसीआयच्या पोर्टलवर सेल्फ एन्युमरेशन फॉर्म भरावा यासाठी र्ेीींंशीी.शलळ.र्सेीं.ळप किंवा एउखछशीं अिि वर जाऊन स्वतःचा तसेच कुटुंबातील सदस्यांचा मतदार यादीतील तपशील तपासून पहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai