नवी मुंबईतील रुग्णसंख्या 1487

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रात शुक्रवारी करोनाचे 65 रुग्ण आढळल्याने करोनाबाधितांची एकूण संख्या 1487 झाली आहे. तर, उपचार सुरू असलेल्या करोनाबाधितांपैकी दोघांचा शुक्रवारी मृत्यू झाल्याने नवी मुंबईत आतापर्यंत एकूण 49 रुग्ण करोनाचे बळी पडले आहेत. 

अद्याप 883 नागरिकांचे करोना चाचणी अहवाल प्रलंबित आहेत. तर, 72 रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने उपचाराअंती बरे होणार्‍या रुग्णांची संख्या 620 झाली आहे. तर, सद्यस्थितीत उपचार सुरू असलेल्या पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या 818 आहे. शुक्रवारी आढळलेल्या 65 रुग्णांमध्ये बेलापूर-1, नेरूळ- 7, वाशी-4, तुर्भे- 23, कोपरखैरणे-10, घणसोली-7, ऐरोली-9 व दिघा -4 येथील रुग्णांचा समावेश आहे. महापालिकेच्या ’कोविड 19’ रुग्णालयात नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील 95 करोनाबाधित उपचारार्थ दाखल आहेत.