कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे नवे निर्देश
- by Aajchi Navi Mumbai
 - Nov 26, 2020
 - 1123
 
1 डिसेंबरपासून 31 डिसेंबरपर्यंत लागू नवे नियम लागू
नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे देशात पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोना प्रसार रोखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी निरीक्षण, नियंत्रण आणि सावधगिरीसाठी काही नवे निर्देश जाहीर केले आहेत. ज्याअंतर्गत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडून कोरोनाच्या संसर्गावर मात करणं, विविध बाबतीत एसओपी काढणं आणि गर्दीवर नियंत्रण आणणे अपेक्षित असल्याची बाब स्पष्ट करण्यात आली आहे. केंद्राकडून जारी करण्यात आलेली ही नवी नियमावली 1 डिसेंबरपासून 31 डिसेंबरपर्यंत लागू असणार आहे.
कोरोना व्हायरस संदर्भात 10 महत्त्वाचे मुद्दे
- केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेल्या सर्व नियमांचे पालन करणे सक्तीचे असणार आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी रात्रीच्या वेळची संचारबंदी आणि सोबतच काही निर्बंध लावण्याची परवानगी दिली आहे. पण, लॉकडाऊन लावण्यासाठी मात्र राज्याला केंद्राची अनुमती घेणं बंधनकारक असेल.
- मोठी बाजारपेठ, साप्ताहिक बाजारपेठ आणि सार्वजनिक वाहतुकीचे प्रकार लक्षात घेता सामाजिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय म्हणून संचालन प्रक्रिया जारी करण्यात आली आहे. ज्याचे सर्वांना काटेकोरपणे पालन करावे लागेल.
- आखण्यात आलेल्या या नव्या नियमांनुसार प्रतिबंधीत क्षेत्रात फक्त जीवनावश्यक सेवांनाच परवानगी असेल.
- मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना या मार्गदर्शक तत्वे लागू करण्याचे आदेश दिले आहेत. या नव्या नियमांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यास मदत होणार आहे.
- प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये सर्व नवे नियम सक्तीने लागू करण्यात येणार आहे. शिवाय याठिकाणी फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. कंटेनमेंट झोनमध्ये प्रवेश करण्यावर आणि बाहेर पडण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
- सणांच्या आणि थंडीच्या दिवसांत विशेष सावधानी बाळगण्याचे आदेश राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशांना देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये लोकांची संख्या मर्यादित ठेवण्यात सांगण्यात आलं आहे.
- प्रतिबंधीत क्षेत्रामधील सर्व महत्त्वाच्या सूचना संकेतस्थळांवर टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी एक विशेष टीमची नियुक्ती करण्यात आली आहे.
- संक्रमित लोकांच्या संपर्कात येणार्याचा शोध घेण्यासाठी तसेच त्यांची वेगळं ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे.
- राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सर्व लोकांना मास्क घालणे. हात स्वच्छ धुवणे आणि सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे पालक करण्यास सांगण्यात आले आहे. नव्या नियमांचे पालन न करणार्यांवर दंडासहित कारवाई देखील करण्यात येणार आहे.
- आंतरराष्ट्रीय प्रवास, सिनेमा हॉल, जलतरण तलाव, प्रदर्शन आणि सामाजिक आणि धार्मिक समारंभांसाठी लागू असलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात आलेले नाही.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
                                    
                            Stock Market by TradingView
                                
                            
                                
                                    
                                                                    
                                                                    
                                                                    
                                            
                                            
                                                    
                                                    
                                                    
                                                    
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai