342 एसटी चालकांवर कारवाई
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 08, 2020
- 694
वाहतुक नियम मोडल्याने चालकांना दंड
पनवेल : एक्स्प्रेस वे वर एसटी बसचालकांकडून वाहतूक नियमांचे पालन केले जात नसल्याचे समोर आले आहे. एसटी महामंडळ व वाहतूक पोलिसांनी गेल्या आठ दिवसांत केलेल्या कारवाईत मार्गिकेचा नियम तोडल्याने 342 बसचालकांवर ई-चलनद्वारे कारवाई करण्यात आली आहे. ओव्हरट्रेक करीत वारंवार मार्गिका बदलत हे चालक बस चालवीत होते.
यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे महामार्गावर प्रवासी वाहतुकीसाठी खासगी बसप्रमाणे शिवशाही, शिवनेरी, विठाई अशा राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणारे लाखो प्रवासी आहेत. मात्र काही बसचालकांकडून वाहतूक नियमांचे पालन केले जात नाही. या संदर्भात पोलीस व राज्य परिवहन महामंडळने यापूर्वी अशी मोठी कारवाई केली नव्हती.
पळस्पे महामार्ग वाहतूक पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी राज्य परिवहन महामंडळाला कळंबोली ते खालापूर या द्रुतगती महामार्गाच्या 30 किलोमीटर अंतराच्या पल्ल्यात कारवाई करण्याचे सुचविल्यावर राज्य परिवहन महामंडळाचे मुख्य नियंत्रक तोरो यांनी या प्रस्तावासाठी तातडीने मान्यता दिली. त्यानुसार बसचालकांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस व महामंडळाचे आठ कर्मचारी नेमण्यात आले. दिवसा ही कारवाई करण्यात आली. यामध्ये दुसर्या मार्गिकेवरून सर्वाधिक एसटी बसगाड्या चालविण्याचे प्रमाण जास्त असल्याचे कारवाईदरम्यान समोर आले. कारवाई ई-चलनने झाल्याने प्रवाशांना कारवाईदरम्यान कोणताही त्रास झाला नाही. मात्र ज्या बसआगारामधील बसगाड्यांवर कारवाई झाली तेथे कारवाईची माहिती तात्काळ कळविण्यात आली. नियम तोडणार्या प्रत्येक वाहनचालकाला सुमारे 200 रुपये दंड भरावा लागणार आहे.
कारवाईत सातत्य
23 जानेवारी ते 30 जानेवारी या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. यापुढेही एसटी बसचालकांवर मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणे, मोबाइलवर बोलणे अशा पद्धतीचे नियम तोडणार्यांवर कारवाई सुरू राहणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai