ही ठिकाणं आहेत ‘कोरोना’चे ‘हॉटस्पॉट’

मुंबई : मुंबईतही कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. मुंबईतल्या झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाने शिरकाव केल्याने सरकारची चिंता वाढली आहे. कोरोनाची लागण लक्षात घेऊन सरकारने 9 हॉटस्पॉट निवडले असून त्या ठिकाणांवर आता सर्व लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये यासाठी ड्रोन कॅमेर्‍यांचीही नजर ठेवली जाणार आहे.

प्रचंड लोकसंख्या, दाटीवाटीने असलेल्या इमारती, अरुंद गल्ल्या, अस्वच्छता त्यामुळे या भागात वेगाने कोरोना पसरण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. 

हे आहेत मुंबईतले 9 हॉटस्पॉट

गोरेगाव - बिंबिसार नगर

धारावी - डॉ. बलिगा नगर

धारावी - वैभव बिल्डिंग

सायन - जैन सोसायटी

सायन कोळीवाडा - पंजाबी नगर

बोरिवली - मेरिलँड कॉम्प्लेक्स

वरळी - पोलीस कॅम्प

वरळी - कोळीवाडा

अंधेरी - गिल्बर्ट हिल