जीएसटी काउन्सिलचा मोठा निर्णय
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 05, 2020
- 625
2022 नंतरही भरपाई उपकर आकारणार राज्य
नवी दिल्ली : जीएसटी परिषदेची आज महत्तवपूर्ण बैठक झाली. या बैठकीत पुन्हा एकदा राज्यांच्या भरपाईचा मुद्दा ऐरणीवर आला. यावेळी लक्झरी आणि इतर अनेक वस्तूंवरील भरपाई उपकर जुलै 2022 पर्यंत वाढविण्यात येणार आहे. राज्यांना होणार्या नुकसानीपासून वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील सर्वच राज्यांनी त्यांची जीएसटीमुळे झालेली करमहसुली तूट भरून काढण्यासाठी व्यावसायिक उसनवारी करावी, असा सल्ला सरकारने दिला होता. ही उसनवारी रिझर्व्ह बँकेने दिलेल्या विशेष सुविधेतून करावी, असेही सरकारने म्हटले होते. मात्र याला पश्चिम बंगाल, पंजाब, केरळ यांसारख्या राज्यांनी विरोध केला होता. मात्र आज झालेल्या बैठकीत सरकारनं जुलै 2022 पासून हा भरपाई वाढवण्याची घोषणा केली आहे. केवळ 20 राज्ये आणि एका केंद्र शासित प्रदेशाने नुकसान भरपाईसाठी केंद्र सरकारचा पर्याय स्वीकारला आहे. काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी शासित बहुतेक राज्यांनी केंद्राचा हा प्रस्ताव नाकारला आहे. हे कर्ज परतफेड करण्यासाठी लक्झरी व इतर अनेक वस्तूंवर भरपाई उपकर 2022 पर्यंत वाढविण्यात येईल, असे आश्वासन केंद्राने दिले होते. नियमानुसार जीएसटी अस्तित्त्वात आल्यानंतर केवळ पाच वर्षांचा कालावधी लागणार होता. सुमारे 2.35 लाख कोटी रुपयांच्या जीएसटीची थकबाकी भरपाई द्यावी, अशी राज्यांनी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. असे आहे भरपाईचे गणित जीएसटीची सुमारे 2.35 लाख कोटी रुपयांची भरपाई आहे, परंतु केंद्र सरकारचे हे गणित आहे की यापैकी जीएसटी लागू झाल्यामुळे सुमारे 97 हजार कोटींचे नुकसान झाले आहे, उर्वरित सुमारे 1.38 लाख कोटी नुकसान कोरोना आणि लॉकडाऊनमुळे झाले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai