15 ऑक्टोबरपासून सिनेमागृह सुरु होणार

केंद्र सरकारची नियमावली जाहीर

मुंबई ः राज्यात अनलॉक 5 चा टप्पा सुरु झाला आहे. यापुर्वीच केंद्रीय गृहमंत्रालयाने अनलॉक 5 अंतर्गत गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. आज चित्रपटगृह सुरु करण्यासाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 15 ऑक्टोबरपासून सिनेमा हॉल, चित्रपटगृह उघड्यास परवानगी दिली आहे. मात्र, थिएटरमध्ये 50 टक्केचं प्रेक्षकांना परवानगी असणार आहे. 

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या लागू केल्यापासून बंद असलेली चित्रपटगृहे आता लवकरच सुरु होणार आहेत. केंद्र सरकारतर्फे चित्रपटगृहे सुरु करण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाद्वारे नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यानुसार, चित्रपटगृहात सुरुवातीला केवळ 50 टक्केच प्रेक्षकांना उपस्थिती देता येणार आहे. सिनेमा, थेटर्स, मल्टीप्लेक्स टॉकीज 15 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरु करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्याचे, माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

काय आहे नियमावलीत

एक सीट सोडून बसावे लागणार

सर्वांना मास्क घालणे बंधनकारक

चित्रपट सुरु होण्याआधी कोरोना जनजागृतीसंदर्भात एक मिनिटाची चित्रपट फित दाखवली जाणार

सिंगल स्क्रिन थिएटरमध्ये जास्त खिडक्या ठेवल्य जाणार

आरोग्य सेतू अ‍ॅप अनिवार्य

पॅकेट फुड पुरवले जाणार