माजी खासदार रामशेठ ठाकूर ‘कोरोना देवदूत’ पुरस्काराने सन्मानित

मुंबई : कोरोना या वैश्‍विक महामारीच्या काळात नागरिकांना सढळ हस्ते मदत करणारे माजी खासदार, दानशूर व्यक्तिमत्व रामशेठ ठाकूर यांना आज (बुधवार, दिनांक 14 ऑक्टोबर) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईतील राजभवन येथे ‘कोरोना देवदूत’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर हेे सुद्धा उपस्थित होते.

दैनिक शिवनेरच्या वतीने हा समारंभ आयोजित करण्यात आला असून माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते रामशेठ ठाकूर यांच्यासह डॉ. जगन्नाथराव हेगडे, डॉ. अमेय देसाई, प्रशांत कारूळकर आणि लीलाधर चव्हाण यांना ‘कोरोना देवदूत’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.