ज्येष्ठ शिवसैनिक प्रमोद विचारे यांचे निधन

ठाणे ः शिवसेनेमध्ये गेली अनेक वर्षे कार्यरत असलेले ज्येष्ठ शिवसैनिक, सामाजिक कार्यकर्ते व खासदार राजन विचारे यांचे मोठे बंधु प्रमोद विचारे यांचे अल्प आजाराने मंगळवारी निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी दुखः व्यक्त केले आहे. 

प्रमोद विचारे यांची तब्येत बिघडल्याने त्यांना एका खासगी रूग्णालयात दाखल केले होते. पण  पचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. शिवसेनेचे माजी नगरसेवक मंदार विचारे यांचे ते वडील होते. त्यांच्यामागे पत्नी, सून, मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. जव्हारबाग येथील स्मशानभूमीत प्रमोद विचारे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चरईत राहणारे विचारे हे मनमिळावून स्वभावामुळे लोकप्रिय होते. तसेच कोणाच्याही मदतीला ते धाऊन जायचे. शिवसेनेच्या अनेक आंदोलनांमध्ये तसेच कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता.