स्थायी समिती सभापतीपदासाठी भाजपतर्फे अर्ज दाखल

पनवेेल : पनवेल महापालिकेच्या स्थायी समिती सभापती, महिला व बालकल्याण सभापती आणि प्रभाग समित्यांची कार्यकाळची मुदत संपल्यामुळे या रिक्त होणार्‍या जागांसाठी सत्ताधारी भाजपच्या वतीने 26 ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल करण्यात आले. 

या निवडणुकीमध्ये स्थायी समिती सभापती पदासाठी नगरसेवक संतोष शेट्टी, महिला व बालकल्याण सभापती पदासाठी नगरसेविका मोनिका महानवर, तर प्रभाग समिती ‘अ’ साठी अनिता पाटील, प्रभाग समित ‘ब’ साठी नगरसेवक समिर ठाकूर, प्रभाग समिती ‘क’ साठी हेमलता म्हात्रे आणि प्रभाग समिती ‘ड’ साठी नगरसेविका सुुशीला घरत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महापालिकेचे सचिव तिलकराज खापर्डे यांच्याकडे संबंधित उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. 28 तारखेला निवडणुक होणार असून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने ही निवडणूक पार पडणार आहे. माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत भाजप-रिपाई युतीचे बहुमत असल्याने त्यांचा या निवडणुकीत विजय निश्‍चित मानला जात आहे.