खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


21 डिसेंबरपर्यंत कोणत्याही घरावर हातोडा पडणार नाही

पालिका आयुक्तांचे मनसेच्या शिष्टमंडळाला आश्‍वासन

नवी मुंबई : शहरातील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत मनसे शिष्टमंडळाने शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेतली. स्थानिक भुमिपुत्रांच्या गरजेपोटीवर होणारी तोडक कारवाई थांबविणे, उद्याने, ग्रंथालये, अभ्यासिका, व्यायामशाळा सुरु करणे, बँजो पथक सराव, नेरुळ सेक्टर 2 मधील मलनिःसारण केंद्र स्थलांतर अशा विषयाबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. 

नवी मुंबईतील गावठाणामध्ये अनेक स्थानिक भूमिपुत्रांनी स्वतःच्या जागेवर गरजेपोटी घरे बांधली आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाकडे सदर घरांसंबंधी चा विषय प्रलंबित आहे. सदर घरे अनधिकृत ठरवून महानगरपालिकेकडून तोडक कारवाई सुरु आहे. त्यामुळे पालिकेने सदर घरांवरील तोडक कारवाई तात्काळ थांबवावी या मागणी संदर्भात मनसेने उच्च न्यायालयाच्या आदेशाची आठवण करून दिली. आयुक्तांनीही सकारात्मक प्रतिसाद देत 21 डिसेंबर पर्यंत कोणत्याही घरावर हातोडा पडणार नाही, तसेच असे  करणार्‍या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असेही सांगितले. उद्याने सुरु करण्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत येत्या 2-3 दिवसात उद्याने नागरिकांसाठी खुली केली जातील असे सांगितले. महानगरपालिका अंतर्गत असणारी ग्रंथालये, अभ्यासिका सुरु नाहीत. त्या संदर्भातील तोडगा काढून हि ग्रंथालये, अभ्यासिका सुरु कराव्यात अशी मागणी मनसेने केली. त्यास प्रतिसाद देत दोन दिवसात पालिकेची ग्रंथालये,अभ्यासिका सकाळी 6 ते रात्री 1 पर्यंत सुरु ठेवू असे आयुक्तांनी सागितले. तसेच महानगरपालिकेच्या व्यायामशाळाही लवकरच सुरु करु असेही आश्‍वासन त्यांनी दिले. नेरुळ, सेक्टर 2 येथील मलनिःसारण केंद्र पूर्ण क्षमतेने सुरु नाही, तसेच याचा परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास होतो. त्यामुळे हे केंद्र पाम बीच शेजारील नेरुळ, सेक्टर 4 येथील मलनिःसारण केंद्रात स्थलांतरित करावे. तसेच नेरुळ सेक्टर 2 येथील मलनिःसारण केंद्रातील जागेवर सर्व सोयीयुक्त सुसज्ज क्रीडासंकुल आणि भव्य वाचनालय सुरु कराव अशी मागणी करण्यात आली. त्यावर स्थलांतरित बाबत मुख्य तांत्रिक अडथळे दूर झालेत. स्थलांतर लवकर करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या. तसेच क्रीडासंकुल आणि वाचनालय उभं करण्याच्या मागणीचा नक्की विचार करू असे सांगितले. मनसेच्या मागणीनुसार सीवूड्स सेक्टर 48 मधील पाळणाघर लवकर सुरु करण्याबाबत सूचना संबंधित अधिकार्‍यांना आयुक्तांनी तात्काळ दिल्या. तसेच ठोक मानधनावर काम करणार्‍या जवळपास 63 शिक्षकांचा मागील 13 महिन्यापासून बाकी असलेला वेतनातील फरक लवकर द्यावा अशी मागणीही मनसेने केली असता हि मागणी आयुक्तांनी तात्काळ मान्य केली आणि बैठकीनंतर केवळ दोन तासात शिक्षकांच्या बँक खात्यावर वेतन फरकातील पैसे आले.

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट