वीज बिल भरु नका!

राज ठाकरेंचे महाराष्ट्रातील जनतेला आवाहन

मुंबई : वाढीव वीज बिलाविरोधातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आज राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढला आहे. ‘वीज बिल भरु नका’, अस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केले आहे. राज ठाकरे यांचे निवेदन मनसे नेत्यांमार्फत जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आलं आहे.

राज ठाकरे जोपर्यंत वीज बिल भरा म्हणून सांगत नाहीत, तोपर्यंत एकाही वीज ग्राहकानं वीज बिल भरु नये. जर का कोणी तुमचे वीज कनेक्शन तोडण्यासाठी आलं तर फक्त जवळपासच्या मनसे कार्यकर्त्याला फोन करा आणि मग परिणाम पाहा, असं आवाहन मनसेने नागरिकांना दिले आहे. वीज बिलांच्या विरोधात राज्यभरात निघालेल्या मनसेच्या मोर्चेकर्‍यांची धरपकड सुरू आहे. मनसेने गुरूवारी राज्यभरात ’झटका मोर्चा’चं आयोजन केलं आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक अशा विविध जिल्ह्यात मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली असल्यानं मनसैनिकांना घेण्यात आले आहे.