‘मास्टरमाईंड’ स्वरांशची चमकदार कामगिरी
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 10, 2020
- 777
राष्ट्रीय स्पर्धेत पटकावले द्वितीय स्थान
नवी मुंबई ः सन 2019-2020 मध्ये पार पडलेल्या ‘मास्टरमाईंड नॅशनल चॅम्पियनशिप’ स्पर्धेमध्ये नवी मुंबईच्या स्वरांश कोळी याने उत्कृष्ट कामगिरी करून दुसर्या क्रमांकाचे मानांकन पटकावले आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्या बुद्धीचा व कौशल्याचा ठसा उमटवून नवी मुंबईचा शैक्षणिक क्षेत्रामध्ये असलेला नावलौकीक वाढवला आहे. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुलात आनंदाचे वातावरण असून सर्वस्तरातून स्वरांशवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
बेलापुर येथे राहणारा 6 वर्षीय स्वरांश कोळी हा तेथीलच भारती विद्यापीठमध्ये सिनीअर केजीमध्ये शिक्षण घेत आहे. या चिमुरड्याने आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर उल्लोखनिय कामगिरी करुन आपल्या शाळेसह नवी मुंबईचे नाव उंचावले आहे. स्वरांश कोळी याने प्रथम शालेय स्तरीय व त्या नंतर राज्यस्तरीय अशा दोन्ही परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून मास्टरमाईंड नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भरघोस यश मिळवले आहे. या स्पर्धेसाठी विविध राज्यातून हजारो विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये स्वरांशने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याला दोन गौरव चिन्ह, एक रौप्य पदक व प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले. त्यावेळी मास्टरमाईंड संस्थेचे संस्थापक बिपिन चेडडा, भारती विद्यापीठ शैक्षणिक संस्थेचे डायरेक्टर डॉ. विलासराव कदम, प्राचार्य आलोक शर्मा, मुख्याध्यापिका रश्मी कुलकर्णी, पर्यवेक्षक जस्विंदर कौर, वर्ग शिक्षिका पूनम सिंग, फेल्सिया सालिन्स, शिकवणी शिक्षिका साबिया शेख व संपूर्ण भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुलाचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते. आपल्या गुणवंत विद्यार्थ्यांला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल त्याचे कौतुक करुन त्याला गौरव चिन्ह व सन्माचिन्ह मान्यवरांच्या हस्ते बहाल करण्यात आले. त्याचवेळी भारती विद्यापीठ शैक्षणिक संस्थेच्या सर्व कर्मचार्यांनी स्वरांशला भेटवस्तू देवून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. स्वरांशच्या या चमकदार कामगिरीमुळे शैक्षणिक क्षेत्रात असलेला नवी मुंबईचा बहुमान अधिकच उंचावला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai