26 जानेवारीपूर्वी शाळा सुरू होण्याची शक्यता

मुंबई :  मुंबई, ठाणे, रायगडमधल्या शाळा 26 जानेवारीपूर्वी सुरू होण्याची शक्यता आहे. जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंत मुंबई, ठाणे, रायगडमधल्या शाळा सुरु करण्याची शिक्षण विभागाची तयारी सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली. 

शाळा सुरु करण्याबाबत आयुक्तांच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे. शाळा सुरु करण्यासंबंधीचा प्रस्ताव पालिका शिक्षण विभागानं आयुक्तांकडे सादर केला आहे. मागील काही दिवसांपासून कमी होणारी रुग्णसंख्या आणि नव्यानं सापडणार्‍या रुग्णांचं लक्षणीयरित्या कमी होण्याचं प्रमाण पाहता यासंदर्भातील निर्णय घेतला जाऊ शकतो. दरम्यान, कोरोना काहीसा नियंत्रणात येत असल्याचं पाहता येत्या काही दिवसांमध्ये मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये शाळा सुरु होणार असल्याचं चित्र आहे. असंख्य पालक आणि विद्यार्थ्यांचं याच निर्णयाकडे लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान, 15 जानेवारीपर्यंत शाळा पुन्हा सुरु करण्यासाठी शिक्षण विभाग सज्ज असल्याची माहिती समोर येत आहे. असं असलं तरीही अंतिम निर्णय पालिका आयुक्त घेणार आहेत.