विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

पनवेल : पनवेल महापालिकेचे  विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 16 जानेवारी रोजी मोफत वैद्यकीय चाचणी शिबिर दिपक लॅबोरेटरी, डी. ए. व्ही शाळेसमोर, नवीन पनवेल येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार आहे. तर 16 जानेवारी रोजी  मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना मार्गदर्शन शिबिर, गोखले सभागृह, पनवेल येथे सकाळी 10 ते 5 या वेळेत होणार आहे. यावेळी Careerr Raiser.in IT Technology expert च्या संस्थापिका दीपा राऊत मार्गदर्शक करणार  आहेत.  

17 जानेवारी रोजी सिद्धी क्लीनिक, वाल्मिकी नगर चौक, पनवेल येथे सकाळी 10 ते 5 या वेळत मोफत वैद्यकीय चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आणि खांदा कॉलनी, सेक्ट्रर 12 येथे सकाळी 10 ते 5 या वेळेत मोफत वैद्यकीय चाचणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. याच दिवशी 17 जानेवारी रोजी नगरसेविका सारिका अतुल भगत यांच्या नगरसेवक निधीतून बनविलेल्या मोठा खांदा गावातील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण कामाचे लोकार्पण सकाळी 10 वाजता, मोठा खांदा गाव येथे करण्यात येणार आहे. आणि नगरसेविका सारिका अतुल भगत यांच्या नगरसेवक निधीतून बांधलेल्या लायन्स गार्डन येथील चावडीचे लोकार्पण17 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता लायन्स गार्डन, जेष्ठ नागरिक सभागृहासमोर, पनवेल येथे करण्यात येणार आहे. त्यानंतर पनवेल शहरातील पायोनीर विभागात तुलसीचे 1 हजार  रोपटांचे वाटप सकाळी 11 वाजता पायोनीर विभाग पनवेल येथे करण्यात येणार आहे. नगरसेविका सारिका अतुल भगत यांच्या नगरसेवक निधीतून बांधलेल्या पनवेल शहर पोलीस स्टेशन येथील पाणपोईचे लोकार्पण 17 जानेवारी रोजी  सकाळी 11.15 वाजता करण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.