खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी तातडीने कारवाई करा

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांचे निर्देश

पनवेल ः कर्नाळा सहकारी बँकेत अनेक शेतकरी बांधवांच्या ठेवी आहेत. या ठेवीदराचे हित लक्षात घेऊन बँकेच्या कामकाजात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी तातडीने कारवाई करावी असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी शुक्रवारी झालेल्या ऑनलाईन बैठकीदरम्यान दिले. तसेच ठेविदारांना त्यांचे पैसे परत मिळण्यासाठी सहकार खात्याने तातडीने उपाययोजना कराव्यात, तसा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेला सादर करून अहवाल पाठवावा. तसेच बँकेचे दुसर्या बँकेत विलिनीकरण करता येईल किंवा पुनर्वसन करता येईल, याविषयी तातडीने निर्णय घ्यावेत असेही त्यांनी स्पष्ट केले. 

शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कर्नाळा सहकारी बँक ठेवी धारकांना न्याय देणे, अवैध खाजगी सावकारीवर    नियंत्रण, ग्रामीण भागातील शेतीमालाचे गोदाम बांधकामबाबत सहकारी बँक व सहकार विभागाची भूमिका या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपसभापती डॉ. गोर्‍हे म्हणाल्या, या बँकेच्या कामकाजात गैरव्यवहार झाल्याने ठेवीदारांना अडचणी निर्माण झाल्या आहेत या ठेवीदारांना संरक्षण देणे महत्वाचे आहे. त्याचे हित लक्षात घेऊन बँकेवर तातडीने कारवाई करावी आणि या ठेवीदारांच्या ठेवी परत कशा देता येतील यासाठी बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणाला गती देऊन याची चौकशी वेळेत पूर्ण करून कारवाई करावी असेही उपसभापती डॉ. गोर्‍हे यांनी यावेळी सांगितले.

या बँकेचे इतर बँकेत विलीनीकरण करून या ठेवीदारांना तातडीने न्याय देता येईल का यासबंधी सहकार विभागाने विचार करून प्रस्ताव तयार करावा आशी सूचनाही डॉ. गोर्‍हे यांनी केली. बँक, पतसंस्था,खाजगी सावकारी यांच्या कडून जर शेतकर्‍यांची फसवणूक झाली तर त्यांना तातडीने सहकार विभागांशी संपर्क साधता यावा यासाठी सहकार विभागाने हेल्पलाईन नंबर आणि व्हाट्सअप नंबर सुद्धा जाहीर करावा त्यामुळे शेतकरी आणि ठेवीदारांना वेळीच मदत होईल असेही डॉ. गोर्‍हे यांनी यावेळी सूचना केल्या.

सहकार विभागाचे प्रधान सचिन अरविंदकुमार म्हणाले, या बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करून शेतकर्‍यांना आणि ठेवीदारांना दिलासा देण्यात येईल, तसेच राज्यातील ज्या बँकेचे अनियमित व्यवहार झाले आहेत त्या सर्व बँकेचे मागील पाच वर्षातील लेखा परिक्षणाचे अहवाल तपासून दोषींवर कारवाई करण्यात येईल.

बैठकीला साखर आयुक्त अनिल कवडे, कृषी व पणन संचालक सतिश सोनी, अतिरिक्त महासंचालक राजेंद्र सिंग, पोलीस विशेष महानिरीक्षक सीआयडी रंजन शर्मा, सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी अरुण इंगळे, कांतीलाल कडू, अँड. निलेश हेलोंडे तसेच सहकार, पोलीस विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट