रबाळे स्थानकातील बंद तिकीट खिडकी पुन्हा सुरु

खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नांना यश

नवी मुंबई ः खासदार राजन विचारे यांनी 14 जानेवारी 2021 रोजी नवी मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांची पाहणी केली. त्या पाहणी दरम्यान रबाळे रेल्वे स्थानकात बर्‍याच महिन्यांपासुन बंद असलेली तिकीट खिडकी सुरू करण्यासाठी सिडको व रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू होता. तसेच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सिडकोच्या समवेत आयोजित केलेल्या बैठकीत नवी मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकात ज्येष्ठ नागरिकांना सरकते जिने व लिफ्टची सुविधा तसेच रिक्षा स्टॅन्ड उपलब्ध करून देण्याचे आदेश सिडको प्रशासनाला दिलेले आहेत. उर्वरित रेल्वे स्थानकातील प्रलंबित कामे आहेत ती मार्गी लावण्याचे आदेशही सिडकोला दिले आहेत. खासदार राजन विचारे यांनी या तिकीट खिडकी संदर्भात सिडकोचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र असल्यापासून यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. त्याला यश आले असून त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला त्यावेळी जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, उपजिल्हा प्रमुख मनोज हळदणकर, उप शहर प्रमुख मंगेश साळवी, राजू पाटील, नगरसेवक रमाकांत म्हात्रे, एम के मढवी, करण मढवी, ममित चौगुले, नवीन गवते, राम यादव, राजू कांबळे, सुरेश कुलकर्णी व इतर शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.