Breaking News
नवी दिल्ली ः घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात सलग दुसर्या दिवशी वाढ झाली आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरचे दर जारी केले आहेत. आता घरगुती गॅसच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत 719 रुपये झाली आहे. हे नवे दर 5 फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत.
तर व्यावसायिक सिलेंडरचे दर 6 रुपयांने घसरले आहेत. यापूर्वी व्यावसायिक एलपीजी सिलेंडर (19 ज्ञस) च्या दरात 190 रुपये प्रति सिलेंडरची वाढ करण्यात आले होते. देशातील 4 मुख्य शहरांतील गॅस सिलेंडरचे दर तपासले असता, दिल्लीत आणि मुंबईत घरगुती 14.2 किलो गॅस सिलिंडरची किंमत 719 रुपये आहे. तर कोलकाता आणि चेन्नईमध्ये अनुक्रमे 745.50 रुपये आणि 735 रुपये इतका घरगुती गॅस सिलेंडरचा दर आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai