चित्रकार जगदिश कर्जेकर यांनी रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या ग्रामिण लोकजीवनाचे आपल्या कुंचल्यातून हुबेहुब चित्र साकारणारे नवी मुंबईस्थित चित्रकार जगदिश कर्जेकर यांनी भटक्या धनगर जमाती, रानावनात वसलेले आदिवासी पाडे, समुद्र किनारी विसावलेल्या होड्या, कोंकणातील टुमदार कौलारु घरे आदी एकाहून एक सरस वास्तववादी चित्रे रेखाटली आहेत.    

सदरची चित्रे ऑईलकलर, ऍक्रॅलिक कलर, वॉटरकलर या माध्यमात रेखाटली आहेत. ती कलारसिकांना पाहता यावीत यासाठी दिनांक 4 ते 15 फेब्रुवारी दरम्यान सकाळी 11 ते रात्री 8.30 या वेळेत नवी मुंबईतील सिडको अर्बन हाट, बेलापूर येथे चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरचे चित्रप्रदर्शन कलाप्रेमींना विनामुल्य पाहता येणार आहे.