तळोजात वाहतूक नियमांची जनजागृती
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 17, 2021
- 803
पनवेल : तळोजा वाहतूक शाखा अंतर्गत रॅपिड अॅक्शन फोर्सचे दोन अधिकारी, 40 जवान, तळोजा शाखेकडील दोन अधिकारी 12 कर्मचारी यांनी वाहतूक नियमांची जनजागृती केली.×रॅली काढून मोटरसायकल चालकांनी हेल्मेट वापरणे विषयी व वाहतुकीचे नियम पाळणे विषयी पोस्टर व मेगा फोनद्वारे आवाहन करण्यात आले.
रॅपिड ऍक्शन फोर्स कॉलनी, चौक या ठिकाणाहून मोटरसायकल रॅली काढून तळोजा फेज वन, तळोजा फेज 2, घोटगाव घोट कॅम्प, आयजीपीएल नाका, एमआयडीसी रोड, नावडे, तळोजा गाव या भागातून रॅलीने जाऊन मोटरसायकल चालकांनी हेल्मेट वापरणे, वाहतुकीचे नियम पाळणे या विषयी पोस्टर व मेगा फोनद्वारे आवाहन करण्यात आले. ह्या रॅलीत पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा पुरुषोत्तम कराड व सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तळोजा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक सावंत व रॅपिड अॅक्शन फोर्सचे असिस्टंट कमांडर संजय चोहान तसेच त्यांचे सहकारी, तळोजा शाखेचे अंमलदार यांनी सहभाग घेतला होता. नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळून एक पाऊल अपघातमुक्त समाज व अपघातमुक्त शहर निर्मिती करण्यासाठी टाकावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai