सिंह होऊन देशाची सेवा करा -समीर वानखेडे
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 10, 2026
- 20
नवी मुंबईः आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधी दिनानिमित्त वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात अन्वय प्रतिष्ठानच्या सहयोगाने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील हे आपले नायक आहेत यांच्याकडून प्रेरणा घ्या, उत्तम करिअर करा, सिंहासारखे जगा आणि सिंह होऊन देशाची सेवा करा असे आवाहन समीर वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना केले.
आपल्या भाषणात त्यांनी अमली पदार्थांचा वाढता गैरवापर आणि त्याचे दुष्परिणाम पाहता आपण सर्वांनी मिळून त्याविरुद्ध लढा देण्याची गरज व्यक्त केली. गॅलेक्सी कंपनीचे सीएसआर प्रमुख कर्नल अमरजीत यांनीही आजच्या विद्यार्थ्यांना आजूबाजूला वावरणाऱ्या अनोख्या, अदृश्य अशा व्यसनरूपी शत्रूशी सामना करायचा आहे. त्या शत्रूशी शिस्त, मनोनिग्रह आणि आत्म नियंत्रणाने तोंड द्या आणि स्वतःला समाजाला आणि देशा ला वाचवा असा मौलिक सल्ला दिला. डॉ अजित मगदूम यांनी अन्वयचे कार्य विशद करतानाच तंबाखू मध्ये असणाऱ्या घातक रसायनांचा उल्लेख करुन रोज तीन-साडेतीन हजार लोक तंबाखू सेवनामुळे मृत्यूच्या दाढेत जातात या कटूसत्याकडे लक्ष वेधून घेतले.
यावेळी व्यसनमुक्ती विषयावरील निबंध स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरलेल्या एकूण सहा विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. प्रारंभी प्रा. प्रतिभा देवणे यांनी सर्वांचे स्वागत केले. प्राचार्या प्राध्यापक डॉ शुभदा नायक यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांची यथोचित ओळख करून दिली. समीर वानखेडे यांना महाविद्यालयातर्फे स्मृतीचिन्ह देऊन यांच्या कार्याचा त्यांनी गौरव केला. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, अन्वयचे अनिल लाड, मुक्ता महापात्रा इतर समुपदेशक, स्त्री मुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्या, अन्य सामाजिक कार्यकर्ते, डॉ गझलकार आप्पा ठाकूर, डॉ दिनेश आदी मान्यवर उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai