मुलांसाठी मोफत ‘हृदय तपासणी शिबीर’
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 25, 2021
- 865
नवी मुंबइ : रिलायन्स हॉस्पिटल नवी मुंबईने 0-18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी निःशुल्क ‘हृदय तपासणी’ शिबिराचे आयोजन शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021 रोजी केले आहे. कोपरखैराणे स्टेशनसमोरील रिलायन्स हॉस्पिटल येथे सकाळी दहा वाजल्यापासून पुढे शिबीर होणार आहे.
हे शिबीर खासकरून अशा मुलांसाठी आहे ज्यांना यापूर्वी हृदय विकार झाला होता किंवा ज्यांची आधी सर्जरी झाली होती, ज्यांच्या हृदयामध्ये काही संशयास्पद स्थिती उत्पन्न झाली आहे किंवा ज्या मुलांना श्वसनाच्या समस्या आहेत अशी सर्व मुले या शिबिरात येऊन तपासणी करून घेऊ शकतात. यावेळी सकाळी दहा वाजल्यापासून पुढे मुलांचे हृदय विशेषज्ञ रुग्णांना तपासतील आणि प्रशिक्षित व्यावसायिक 2डी इको व फीटल इको या सेवा निःशुल्क पुरवतील.
मुलांमधील कार्डिओलॉजिकल समस्यांबाबत जागरूकता, माहिती वाढवणे व हृदयाच्या समस्या असलेल्या मुलांसाठी सर्वात चांगल्या उपचारांचे कोणते पर्याय उपलब्ध आहेत याबाबत माहिती मिळवण्यात पालकांची मदत करणे हा या शिबिराचा उद्देश आहे. या शिबिराच्या आयोजनामध्ये कोविड-19 संदर्भात सर्व आवश्यक काळजी घेतली जाईल. शिबिराला येणार्या प्रत्येक व्यक्तीने कृपया मास्क घालावा, ते अनिवार्य आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai