मुंबई ते नवी मुंबई जल वाहतूक लवकरच होणार सुरु
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 25, 2021
- 907
मुंबई : नवी मुंबईतून मुंबईत जाणार्या प्रवाशांना रस्ते आणि रेल्वे मार्गाव्यतिरिक्त आणखील एका मार्गाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. येत्या काही महिन्यातच मुंबई ते नवी मुंबई जल वाहतूक सुरू होणार आहे. या वर्षीच मुंबईतील प्रिन्सेस डॉक ते बेलापूर अशी जल वाहतूक कार्यान्वित केली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ कमी होणार असून सूखकर प्रवास होण्यास मदत होणार आहे. तसेच रस्ते मार्गावरील वाहतुककोंडंी फुटण्यास मदत होईल.
येत्या 2 ते 4 मार्च दरम्यान मेरीटाईम इंडिया समिट होणार आहे. त्यात जगभरातील अनेक देश आणि कंपन्या सहभागी होतील. यावर्षी या समिटचे दुसरे वर्ष असून कोरोना मुळे व्हर्चुअल पद्धतीने ही समिट होणार आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी बुधवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. राजीव जलोटा यांना मुंबई, नवी मुंबई, ठाणे या शहरांना जोडणार्या जलवाहतूक प्रकल्पांविषयी माहिती विचारली असतो ते म्हणाले की, सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. अगदी लहान लहान काही गोष्टी शिल्लक आहेत, त्या देखील पूर्ण होतील. त्यामुळे या वर्षीच काही महिन्यानंतर आपण मुंबई आणि नवी मुंबई ही शहरे जलमार्गाने जोडू शकू. मुंबईतील प्रिन्सेस डॉक ते बेलापूर हा पहिला मार्ग आपण सुरू करणार आहोत. त्यानंतर वाशी, नेरुळ, ऐरोली, ठाण्यातील मीठ बंदर अशा वेगवेगळ्या ठिकाणी थांबा दिला जाईल.
मुंबई ते बेलापूर ही जलवाहतूक सुरू झाल्यास 1 तासात मुंबई ते नवी मुंबई अंतर कापले जाईल. येणार्या 1 वर्षात रोरो आणि रोपॅक्स पद्धतीने नवी मुंबई प्रमाणेच मुंबईपासून काशीद, रेवस, करंजा आणि जेएनपीटीपर्यंत सुरू होईल. रोरोमध्ये मोठ्या जहाजात थेट लहान वाहनांपासून मोठ्या ट्रकपर्यंत जलवाहतूक केली जाते तर रोपॅकसमध्ये प्रवासी आणि वाहनांची एकत्र जलवाहतूक करण्यात येते. सध्या जेएनपीटी येथे रोरो जेट्टी उभारण्याचे काम सुरू आहे. त्याचे काम एक दोन महिन्यात पूर्ण होईल. त्यानंतर मुंबईतील ट्रक रस्ते मार्गाने न जाता जल वाहतुकीने जेएनपीटी येथे जाऊ शकतील. या दोन्ही गोष्टीमुळे मुंबईच्या, नवी मुंबईच्या आणि ठाण्याच्या रस्त्यावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात कमी होईल. तसेच लोकलमध्ये होणारी गर्दी देखील काही प्रमाणात कमी होईल.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai