धुरांच्या रेषा काढणारी आगगाडी धावणार विजेवर
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 01, 2021
- 834
कोकण रेल्वे मार्गावर विद्द्युत इंजिनची यशस्वी चाचणी
मुंबई : झुकझुक झुकझुक आगीन गाडी.. धुरांच्या रेषा हवेत काढी.. असे चित्र अजूनही कोकण मार्गवर पाहायला मिळते. मात्र आता या मार्गावर धुरांच्या रेषा हवेत काढणारी आगगाडी विजेवर धावणार आहे. नुकतीच रोहा ते रत्नागिरी पहिले विद्द्युत इंजिन धावले. ही यश्स्वी चाचणी झाल्याने आता कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या यापुढे विजेवर चालणार आहेत. त्यामुळे प्रदूषण टळणार असून निसर्गाला कोणतीही बाधा पोहोचणार नाही.
येत्या काही महिन्यात कोकण रेल्वे मार्गावरुन डिझेल इंजिनावर धावणार्या सर्व गाड्या बंद होऊन फक्त विजेवर चालणार्या गाड्याच धावणार आहेत. कोकण रेल्वे मार्गावर अलिकडेच पहिले विद्द्युत इंजिन धावले आहे. या इंजिनाची ट्रायल घेण्यात आली. त्यामुळे आता धूर सोडणारे इंजिन धावणार नाही. तसेच इंजिनाचा वेगही वाढणार आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास वेगवान होणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावर गेल्या चार-पाच वर्षांपासून सुरू असलेले विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्याकडे आले आहे. रोहा ते रत्नागिरी या दरम्यान 22 फेब्रुवारीपासून ओव्हरहेड इलेक्ट्रीक वाहिनीमधून 25 घत चा विद्द्युत प्रवाह टेस्टिंगसाठी कार्यान्वित केला गेला आहे. या पार्श्वभूमीवर लोकोमोटिव, कोच मेंटेनन्स आदी कर्मचार्यांना कोकण रेल्वेच्या रिजनल मेकॅनिकल इंजिनिअर, रत्नागिरी यांच्याकडून सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. 23 फेब्रुवारीपासून वीज प्रवाहाची तपासणी करण्यात आल्यानंतर गुरुवारी पहिल्यांदा वीजेवर धावणारे इंजिन चालवून यशस्वी चाचणी घेण्यात आली. त्यानंतर रोहा ते रत्नागिरी असे पहिले विद्द्युत इंजिन धावले. ही यश्स्वी चाचणी झाल्याने आता कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या यापुढे विजेवर चालणार आहेत.
रोहा ते रत्नागिरी दरम्यान, विद्युतीकरण पूर्णत्वाला गेले आहे. या मार्गावर गुरुवारी 203 किमीची ‘ट्रायल रन’ पूर्ण केलेले इलेक्ट्रिक इंजिन रत्नागिरी येथून पुन्हा रोह्याकडे रवाना झाले. रोहा ते करंजाडी आणि दिवाण खवटी ते रत्नागिरी या रेल्वे मार्गावर ही इंजिन चाचणी यशस्वी झाली. त्यामुळे आता कोकण रेल्वे मार्गावर डिझेल ऐवजी वीजेवरील इंजिनाच्या सहाय्याने मेल-एक्स्प्रेस धावणे शक्य होणार आहे. या चाचणीमुळे आता कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर रोहा ते रत्नागिरीदरम्यान रेल्वे गाड्या विजेवर धावणार आहेत. दरम्यान, त्याआधी कोकण रेल्वेच्या दक्षिण भागात जानेवारी 2021 मध्ये कोकण रेल्वेने ठोकूर-उडुपी दरम्यान इलेक्ट्रिक लोको यशस्वी चाचणी घेतली होती. या विद्युतीकरणामुळे कोकण रेल्वेचे 200 कोटी रुपये वाचणार आहेत. सध्या डिझेलवर रेल्वेला 300 कोटी रुपयांचा खर्च होत आहे. मात्र, आता विजेवर गाड्या धावण्यासाठी 100 कोटी रुपये खर्च लागण्याची शक्यता आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai