ऐरोलीत मोफत योग वर्ग सुरू

नवी मुंबई : कोरोना काळात आलेला तणाव दुर करण्यासाठी योग हाच एकमेव पर्याय आहे. त्यासाठी श्री अंबिका योगाश्रमची त्रैमासिक मोफत योग वर्ग रविवारी 7 मार्चपासुन ऐरोली येथे सुरू करण्यात येत आहे. आनंदमयी जीवनासाठी नागरिकांनी योग वर्गाचा लाभ घ्यावा असे अहवान योगाचार्य नित्यानंद प्रभु यांनी केले आहे. 

योगाचार्य निकम गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री अंबिका योगाश्रम गेली 20 वर्षे योगाचे प्रशिक्षण विनामूल्य देत आहे. या संस्थेच्या 40 शाखा सुरू असून यात ऐरोली येथील श्री अंबिका योगाश्रमच्या शाखेतून गेली 15 वर्षे पासून नित्यानंद प्रभु यांच्या मार्गदर्शनाखाली दर रविवारी मोफत योगाचे वर्ग घेण्यात येत आहेत. गेली वर्षभर करोना संसर्गामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. यातूनच मानसिक व शारीरिक तणाव निर्माण होऊन आरोग्याच्या तक्रारी निर्माण झाल्या आहेत. यातुन मार्ग काढण्यासाठी योगा करणे गरजेचे असल्याने करोनाच्या काळानंतर रविवार 7 मार्च रोजी सकाळी 7 ते 9 वेळात योग वर्ग सुरू करण्यात येत आहेत. हे वर्ग विनामूल्य असल्याने नागरिकांनी त्याचा लाभ घेऊन आपले आरोग्य सुदृढ ठेवावे तसेच, योग वर्गासाठी कोणत्याही पुर्व नोंदणी किंवा परवानगीची आवश्यकता नसल्याचे  अहवान योगाचार्य नित्यानंद प्रभु यांनी केले आहे.