शहरात 30 केंद्रांवर लसीकरण
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 10, 2021
- 692
ऐरोलीतील कोव्हीड लसीकरण केंद्रांना आयुक्तांची भेट
नवी मुंबई ः जास्तीत जास्त नागरिकांना कोव्हीड 19 लसीकरण व्हावे याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोव्हीड लसीकरण केंद्रांमध्ये सातत्याने वाढ करण्यात येत असून आजपासून महानगरपालिकेच्या सीबीडी, करावे, कुकशेत, शिरवणे, जुहूगांव, घणसोली, ऐरोली, दिघा, पावणे, राबाडे, कातकरीपाडा व इलठणपाडा अशा 12 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण सुरू करण्यात आलेले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 9 मार्चपर्यंत 35561 लाभार्थींना लसीकरण करण्यात आले असून सद्यस्थितीत 30 लसीकरण केंद्रांवर लसीकरण होत आहे. यामध्ये 19 महानगरपालिका रूग्णालये व आरोग्य केंद्रे तसेच 11 खाजगी रुग्णालयांचा समावेश आहे. 11 मार्चपासून वाशी, नेरूळ व ऐरोली येथील 3 सार्वजनिक रूग्णालयांत अहोरात्र 24 तास लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा महत्वपूर्ण निर्णय महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतलेला आहे. 12 मार्च पासून माता बाल रुग्णालय तुर्भे आणि प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र तुर्भे या 2 ठिकाणीही लसीकरण केंद्र कार्यान्वित केली जाणार आहेत. या अनुषंगाने आयुक्तांनी आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोली, सेक्टर 3 येथील राजमाता जिजाऊ रूग्णालय तसेच चिंचपाडा प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र येथील लसीकरण केंद्राला भेट देत त्याठिकाणी होत असलेल्या लसीकरण कार्यवाहीची पाहणी केली. तसेच ऐरोली रूग्णालयातील आयसीयू वॉर्ड आणि महिला व पुरूषांचे मेडिकल वॉर्ड्स याठिकाणी भेट देऊन कार्यवाहीची पाहणी केली. यावेळी आयुक्तांनी लस घेऊन निरीक्षण कक्षात थांबलेल्या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत त्यांची विचारपूस केली. महानगरपालिकेच्या केंद्रात मोफत लसीकरण सुरू झाल्याची माहिती आपल्या परिचयातील 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना तसेच 45 वर्षावरील कोमॉर्बिड व्यक्तींना द्यावी असे आयुक्तांनी यावेळी निरीक्षण कक्षातील ज्येष्ठ नागरिकांना आवाहन केले. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या वतीने सोशल मिडियावरून लसीकरण केंद्रांची यादी व्यापक स्वरूपात प्रसिध्द करावी अशा सूचना केल्या. प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांच्या अंतर्गत क्षेत्रात तेथील आशा वर्कर यांच्यामार्फतही नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवावी असे वैद्यकीय अधिकारी यांना सूचित करण्यात आले.
खाजगी रूग्णालये
(1) डिव्हाईन हॉस्पिटल, घणसोली,
(2) महात्मा फुले चॅरिटेबल ट्रस्ट (चझउढ) हॉस्पिटल, सानपाडा,
(3) आर.एन.पाटील सुरज हॉस्पिटल, सानपाडा,
(4) आचार्य श्री नानेश हॉस्पिटल, सी.बी.डी. बेलापूर,
(5) मंगलप्रभु हॉस्पिटल, जुईनगर,
(6) डि.वाय.पाटील हॉस्पिटल नेरुळ,
(7) सुयश हॉस्पिटल नेरुळ,
(8) सुश्रुषा हॉस्पिटल नेरुळ,
(9) इंद्रावती हॉस्पिटल से-3 ऐरोली,
(10) सनशाईन हास्पिटल नेरुळ,
(11) तेरणा हॉस्पिटल नेरुळ
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai