खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या 32 व्यक्तींवर कारवाई

त्यांची अँटिजेन टेस्टींग ; 2 पॉझिटिव्ह व्यक्तींची कोव्हीड सेंटरमध्ये रवानगी

नवी मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या विविध प्रतिबंधांनुसार संचारबंदी लागू असून नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडणे अपेक्षित नाही. तरीही काही नागरिक मॉर्निग वॉक अथवा इव्हिनींग वॉकसाठी घराबाहेर पडत असल्याचे निदर्शनास येत असल्याने पोलीस विभागाच्या सहकार्याने नवी मुंबई महानगरपालिकेची पथके कारवाई करीत आहेत. अशा 32 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्यांची अँटिजेन टेस्टींग करण्यात आली. त्यातील 2 पॉझिटिव्ह व्यक्तींची कोव्हीड सेंटरमध्ये रवानगी करण्यात आली आहे. 

26 एप्रिलला बेलापूर विभाग अधिकारी तथा सहा,आयुक्त शशिकांत तांडेल यांनी एन.आर.आय.पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांच्यासह संयुक्तपणे कारवाई करीत एन.आर.आय. संकुल परिसरात संध्याकाळी इव्हिनींग वॉकसाठी विनाकारण घराबाहेर पडणार्‍या 18 व्यक्तींवर कारवाई करीत प्रत्येकी रू.1 हजार याप्रमाणे एकूण रू. 18 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल केली होती. तथापि अशाप्रकारे मॉर्नींग, इव्हिनींग वॉकसाठी संचारबंदी असूनही घाराबाहेर पडणार्‍या नागरिकांबाबत गांभीर्याने बाळगत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन करून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये अडथळा आणणार्‍या नागरिकांविरोधात कायदेशीर कारवाई प्रमाणेच त्यांची तिथेच कोव्हीड टेस्ट करण्याचा निर्णय जाहीर केला होता.

त्याच्या अंमलबजावणीस सुरूवात करण्यात आली असून बेलापूर विभागात ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरात मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या 32 व्यक्तींवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची तिथेच अँटिजेन टेस्टींगही करण्यात आली आहे. यामध्ये चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या 2 कोरोना बाधित व्यक्तींना संबंधित नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्‍यांना सूचित करून कोव्हीड केंद्रात दाखल करण्यात आलेले आहे. कोव्हीड विरोधातील लढा हा सर्व नागरिकांनी समविचाराने परंतू एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवून लढावयाचा आहे. यामध्ये सर्वांच्याच आरोग्य हितासाठी कोव्हीड नियमांचे व शासन आदेशांचे प्रत्येकाने पालन करणे अत्यंत गरजेचे असून नागरिकांनी त्याकरिता संपूर्ण सहकार्य करावे व कारवाईची कटू वेळ येऊ देऊ नये असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे. 

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट