राज्यात 31 मेपर्यंत लॉकडाऊन कायम!

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या प्रादुर्भावामुळे 15 मेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. अशातच राज्यात लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून आला. आता राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. राज्यात 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. 1 जून सकाळी 7 वाजेपर्यंत निर्बंध लागू असणार आहे. यासंदर्भातील परिपत्रक राज्य सरकारनं जारी केलं आहे. यापूर्वी लागू असलेले निर्बंध यापुढेही कायम असतील असं नमूद करण्यात आलं आहे. तसेच काही नव्या नियमांचाही समावेश करण्यात आला आहे. 

राज्यात लॉकडाऊन वाढवण्यात आला असून परराज्यातून महाराष्ट्रात येणार्‍यांसाठी ठढझउठ चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. राज्यात प्रवेश करण्याआधी 48 तासांपूर्वीचा ठढझउठ चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणं बंधनकारक असणार आहे. त्यासोबतच राज्य सरकारनं कोरोनाचा प्रादुर्भाव असणार्‍या काही राज्यांची यादी जाहीर केली होती. त्या राज्यातून येणार्‍या नागरिकांनाही ठढझउठ चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असेल तरच राज्यात प्रवेश मिळणार आहे. राज्यात लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे बुधवारी पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवलं जावं अशी मागणी अनेक मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्याची मागणी सर्वच मंत्र्यांनी केली आहे. मात्र लॉकडाऊन बाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर करतील, असं राजेश टोपे यांनी सांगितलं होतं.