कोविशील्डच्या दुसर्या डोसचे अंतर वाढले
- by Aajchi Navi Mumbai
- May 13, 2021
- 965
दोन डोसमध्ये 12 ते 16 आठवड्यांचं अंतर असावं ; सरकारी समितीची शिफारस
नवी दिल्ली : भारतात कोरोना संसर्गाविरोधात सुरु असलेल्या लसीकरण अभियानात दोन लसींचा वापर होत आहे. नागरिकांना सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन या लसींचे प्रत्येकी दोन डोस दिले जात आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये लसीचा तुटवडा आहे. तिसर्या टप्प्यातील लसीकरण सुरु केल्यानंतरही अनेक राज्यांमध्ये 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरु होऊ शकलेलं नाही. याच दरम्यान एका सरकारी पॅनलने कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याची शिफारस केली आहे.
सरकारच्या छढअॠख या समितीने कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवून 12 ते 16 आठवडे करण्याची शिफारस केली आहे. तर कोवॅक्सिनच्या डोसमधील अंतरात कोणताही बदल केलेला नाही. तर गर्भवतींच्या लसीकरणाबाबतही समितीने महत्त्वपूर्ण शिफारस केली आहे.
समितीने केलेल्या शिफारशी
- कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमध्ये तीन ते चार महिन्याचं (12 ते 16 आठवडे) अंतर ठेवण्याची शिफारस सरकारच्या छढअॠख समितीने केली आहे. तर कोवॅक्सिनसाठी कोणताही बदल नाही. कोवॅक्सिन लसीच्या दोन डोसमध्ये पहिल्या सूचनेनुसार 28 दिवसांचं अंतर असेल.
- गर्भवती महिलांना कोरोना प्रतिबंधक लस ऐच्छिक आहे, त्यांनी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तर बाळांना स्तनपान करणार्या माता प्रसुतीनंतर कधीही लस घेऊ शकतात.
- कोविड-19 पॉझिटिव्ह झालेल्या नागरिकांनी बरं झाल्यानंतर सहा महिन्यांनी लस घ्यावी, अशी शिफारसही समितीने केली आहे.
2 ते 18 वयोगटासाठी कोवॅक्सिनच्या चाचणीला परवानगी
2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर भारत बायोटेकची कोवॅक्सिन या स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लसीची क्लिनिकल चाचणी घेण्यास औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली आहे. तज्ज्ञ समितीने 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर कोवॅक्सिन लसीच्या दुसर्या/तिसर्या टप्प्याच्या चाचणीसाठी शिफारस केली होती. त्याला आता डीजीसीआयकडून परवानगी मिळाली आहे. 525 स्वयंसेवकांवर ही चाचणी होणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai