कोकण रेल्वेच्या पॉलीप्रोपिलीनच्या पहिल्या कंटेनर रेकला हिरवा झेंडा
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 22, 2026
- 69
नवी मुंबई ः मालवाहतुकीच्या क्षेत्रात विस्तार करण्याच्या आणि बहुविध (मल्टिमोडल) लॉजिस्टिक्सला बळकटी देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, कोकण रेल्वेने ठाकूर स्टेशनवरून पॉलीप्रोपिलीनच्या पहिल्या कंटेनर रेकचे उद्घाटन केले. यामुळे कोकण रेल्वे नेटवर्कवर कंटेनरद्वारे वाहतुकीच्या नव्या प्रवाहाला सुरुवात झाली आहे.
पॉलीप्रोपिलीनची ही नवीन मालवाहतूक 22 जानेवारी 2026 रोजी सुरू झाली असून, पहिला कंटेनर रेक ठाकूर स्टेशनवरून रवाना करण्यात आला. कंटेनर आणि इतर मालवाहतुकीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, कोकण रेल्वेने सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन यांच्या सहकार्याने ठाकूर स्टेशनवर अत्याधुनिक पायाभूत सुविधा विकसित केल्या आहेत. यामध्ये पक्के व्हार्फ व जोड रस्ते, आच्छादित गोदामे, खुले साठवण यार्ड आणि इतर आधुनिक लॉजिस्टिक सुविधा समाविष्ट असून, ठाकूर हे पूर्णतः सुसज्ज मालवाहतूक टर्मिनल बनले आहे. वाहतूक करण्यात येणारे पॉलीप्रोपिलीन हे मंगळूर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेडचे आहे. सरासरी दरमहा सुमारे दोन कंटेनर रेक चठझङ कडून राजस्थानमधील मोरबी भागासाठी वाहतुकीसाठी दिले जाण्याची अपेक्षा आहे. ही वाहतूक उथउ मालकीच्या कंटेनर रेकद्वारे सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनकडून हाताळली जाणार आहे. यासाठी चठझङ आणि उथउ यांच्यात औपचारिक करार करण्यात आला आहे.
या नव्या मालवाहतूक प्रवाहातील पहिला रेक ठाकूर ते छउङथ दरम्यान धावला असून, त्याला एमआरपीएलचे व्यवस्थापकीय संचालक मुंदकूर श्यामप्रसाद कामत, उथउ चे व्यवस्थापकीय संचालक संतोष सिन्हा, कोकण रेल्वेचे संचालक (व्यावसायिक व संचालन) सुनील गुप्ता, चठझङ चे संचालक (रिफायनरी) नंदकुमार वेलायुधन पिल्लई, संचालक (वित्त) देवेंद्र कुमार, उथउ चे संचालक (वित्त) नीरज प्रियदर्शी, चठझङ चे कार्यकारी संचालक (मार्केटिंग व बिझनेस डेव्हलपमेंट) डॉ. दीपक प्रभाकर पी., उथउ चे संचालक (मार्केटिंग व कॉर्पोरेट प्लॅनिंग) सॅम्युअल प्रविण कुमार आणि कोकण रेल्वेचे उउच आशुतोष श्रीवास्तव यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
यावेळी घठउङ, चठझङआणि उथउ चे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते, ज्यातून या उपक्रमामागील मजबूत सहकार्य स्पष्ट झाले.या मालवाहतुकीच्या सुरुवातीमुळे इतर ग्राहकांनाही ठाकूर स्टेशनवरील सुधारित सुविधा व सेवा वापरण्यास प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा आहे. या घडामोडीमुळे कोकण रेल्वेची कार्यक्षम, विश्वासार्ह आणि ग्राहक-केंद्रित मालवाहतूक सेवा देण्याची बांधिलकी अधिक दृढ होत असून, औद्योगिक विकास आणि लॉजिस्टिक कार्यक्षमतेला चालना मिळणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai