तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना ‘निसर्ग’प्रमाणेच भरपाई
- by Aajchi Navi Mumbai
- May 25, 2021
- 684
मुख्यमंत्र्यांची घोषणा; कुणालाही मदतीपासून वंचित ठेवलं जाणार नाही
मुंबई : गत वर्षीं आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने निसर्गाचे तसेच नागरिकांचे अतोनात नुकसान केले होते. त्यातून नागरिक सावरले न सावरले तोच तौक्तेचा जोरदार फटका बसला. त्यामुळे किनारपट्टीजवळ असलेल्या जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तौत्के चक्रीवादळग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळग्रस्तांप्रमाणेच नुकसानभरपाई दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
गेल्या आठवड्यात कोकण किनारपट्टीवर तौत्के चक्रीवादळानं जोरदार तडाखा दिला. या तडाख्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यासह राज्यातील सागरी किनार्यावरील हजारो नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाईल, असं मुख्यमंत्र्यांकडून मंगळवारी सांगण्यात आलं. 21 मे रोजी मुख्यमंत्र्यांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा दौरा केला होता. त्या दौर्यावर विरोधकांकडून जोरदार टीकाही झाली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी कोकणवासियांसाठी मदतीची घोषणा केली आहे. दौर्यावेळी तात्पुरती घोषणा न करता आढावा घेऊन व्यवस्थित मदत दिली जाईल. कुणालाही मदतीपासून वंचित ठेवलं जाणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं त्याप्रमाणे त्यांनी आज घोषणा केली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai