अवैध मद्याचे 625 खोके जप्त
- by Aajchi Navi Mumbai
- May 26, 2021
- 598
पनवेल : गोवा राज्यात निर्मिती व विक्रीसाठी असलेल्या भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याचे 625 खोके राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडले असून या मद्यासह ते वाहून नेणारा ट्रक असे एकूण 67 लाख 57 हजार रूपयांचा मुद्देमाल या पथकाने जप्त केला आहे. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. सायन-पनवेल मार्गावर खारघर उड्डाण पूलाखाली ही कारवाई करण्यात आली.
कोकण विभागाचे उपायुक्त सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या महाराष्ट्र राज्य भरारी पथकाने ही कारवाई केली. सायन-पनवेल मार्गावर खारघर उड्डाण पूलाखालून अवैधरित्या विदेशी मद्याची वाहतूक होणार असल्याची खबर मिळताच मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पाळत ठेवून गोवा राज्यात निर्मिती व विक्रीसाठी असलेल्या भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याचे 635 खोके असलेला ट्रक पकडला. ब्लेंडर्स प्राईड, रॉयल चॅलेंजर्स, अरोबेला व्होडका, इम्पिरियल ब्लू व्हिस्की या ब्रँडच्या 750 मि.ली.वजनाच्या बाटल्यांचे 525 खोके तर बडवायझर बियरचे अर्धा लीटर वजनाच्या टीनचे 100 खोके असे एकूण 625 खोके ट्रकसह भरारी पथकाने जप्त केले आहेत. ट्रकसह या मद्याची एकूण किंमत 67 लाख 57 हजार 740 रुपये असून याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.
गेल्या सहा दिवसांपूर्वीच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पनवेल येथे गोवा राज्यातील अवैध मद्याचे 56 लाख 50 हजार रुपये किंमतीचे 500 खोके तर 20 मे रोजी उस्मानाबाद येथेही 43 लाख 93 ह्जार रुपये किमतीचे अवैध मद्याचे 575 खोक्यांसह मुद्देमाल या पथकाने जप्त केला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai