रायगड ‘मॉडेल जिल्हा कार्यशाळेचे’ उद्घाटन
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 17, 2026
- 20
डिजिटल आरोग्य क्रांतीच्या दिशेने राज्याचे मोठे पाऊल
पनवेल ः केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात आयुष्मान भारत डिजिटल मिशनची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. या अंतर्गत रायगड जिल्ह्याची मॉडेल जिल्हा म्हणून निवड करण्यात आली असून, या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या यशस्वी सुरुवातीसाठी (9 जून) पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात रायगड मॉडेल जिल्हा कार्यशाळेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
आयुष्मान भारत डिजिटल मिशन ची प्रभावी अंमलबजावणी, आरोग्य सेवांचे डिजिटायझेशन व उत्कृष्ट कार्याबद्दल पनवेल महानगरपालिकेस मागीलवर्षी राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या राज्यस्तरीय कार्यशाळेमध्ये आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये केलेल्या कामाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे सीइओ डॉ. सुनीलकुमार बर्नवाल यांनी सांगितले, आरोग्य व्यवस्थेचे डिजिटलायझेशन केल्याने नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक व परिणामकारक आरोग्य सेवा उपलब्ध करून देता येणार आहेत. रायगड जिल्ह्यात आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या माध्यमातून सर्व सुविधा तळागाळापर्यंत पोहचावायच्या आहेत तेव्हाच रायगड हे ‘ मॉडेल जिल्हा’ बनेल. यासाठी आपण रोडमॅप बनवून त्यानुसार काम करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी असून याद्वारे रोग प्रतिबंधात्मक आरोग्याकडे वाटचाल करणार आहोत. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही महत्वपुर्ण या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि परिणामकारक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, तसेच संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचे डिजिटायझेशन करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
आरोग्य विभागाचे सचिव ई.रविंद्रन यांनी या मिशन बाबत महाराष्ट्र राज्याने दिलेले योगदान आणि येत्या काळात करण्यात येणाऱ्या नियोजनाविषयी विवेचन केले. रायगड जिल्ह्यातील यशस्वीतेनंतर संपुर्ण महाराष्ट्रात हे मॉडेल राबविण्याचे उद्दिष्ट त्यांनी बोलून दाखविले. पंकजकुमार अरोरा यांनी “आयुष्मान भारत डिजिटल मिशन” ची तांत्रिक बाजू आणि एकूणच त्याबाबतची कार्यवाही याबाबत सविस्तर माहिती दिली. डॉ.जगन्नाथ वीरकर यांनी “आयुष्मान भारत डिजिटल मिशन” बाबत प्रशासकीय व्यवस्था आणि करावयाची कार्यवाही याबाबत सविस्तर सादरीकरण केले. रायगड जिल्ह्यातील 383 शासकीय आरोग्य संस्थांमध्ये आधीच-संलग्न प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून, आता जिल्ह्यातील खासगी आरोग्य संस्थांनाही यात सहभागी करून घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वाती नेहुलकर यांनी उपस्थितांना रायगड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेकडून आरोग्य क्षेत्रात झालेल्या आणि होत असलेल्या कामांविषयीची माहिती दिली.
- 650 हून अधिक प्रतिनिधींची उपस्थिती
आरोग्य क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी, शासकीय वैद्यकीय अधिकारी, खासगी वैद्यकीय व्यावसायिक आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी असे सुमारे 650 प्रतिनिधी या कार्यशाळेत सहभागी झाले होते. या कार्यशाळेत आयुष्मान भारत डिजिटल मिशनची उद्दिष्टे, डिजिटल आरोग्य नोंदींची अंमलबजावणी, आभा आयडी निर्मिती, हेल्थ फॅसिलिटी रजिस्ट्री आणि हेल्थकेअर प्रोफेशनल रजिस्ट्री यांसारख्या तांत्रिक व महत्वपूर्ण विषयांवर तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. - इतर जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक ठरणार रायगड मॉडेल
रायगड जिल्ह्याची मॉडेल जिल्हा म्हणून झालेली ही निवड महाराष्ट्राच्या डिजिटल आरोग्य क्षेत्रासाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे. या उपक्रमातून समोर येणाऱ्या सर्वोत्तम कार्यपद्धती आणि अनुभव भविष्यात राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांसाठी दीपस्तंभाचे काम करतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. - डिजिटललाझेशन पालिका अव्वल
सद्यस्थितीमध्ये पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत महानगरपालिकेचे एकुण 26 आरोग्य केंद्रांची नोंदणी करून प्रमाणित करण्यात आले आहे. या केंद्रांमधील एकुण 234 कर्मचाऱ्यांची अंतर्गत नोंदणी पूर्ण करण्यात आलेली असुन सर्व संस्थांचे- प्रणालीमध्ये यशस्वी नोंदणी करण्यात आले आहे. खाजगी आरोग्य संस्थांपैकी 1713 वैदयकीय अधिकारी, 3573 नर्स, 192 औषधनिर्माता व 116 करण्यात आलेली असुन प्रयोगशाळा तंत्रज्ञ असे एकुण 5594 खाजगी आरोग्य व्यावसायिकांची मिशन अंतर्गत नोंदणी पूर्ण करण्यात आलेली असून पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत 220 खाजगी आरोग्य संस्थांपैकी 147 संस्थांची नोंदणी पूर्ण करण्यात आली असून उर्वरित संस्थांचे ऑनबोर्डिंग सुरू आहे. - डिजिटल आरोग्य मोहिमेत महाराष्ट्राची गरुडझेप
महाराष्ट्र राज्याने डिजिटल आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. राज्यात आतापर्यंत 7.12 कोटी नागरिकांचे आभा आयडी तयार झाले असून, 96 हजार 210 आरोग्य व्यावसायिक आणि 34 हजार 964 आरोग्य संस्थांची नोंदणी पूर्ण झाली आहे. याशिवाय, राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये मायक्रोसाईट प्रोजेक्ट राबवून खासगी क्षेत्रातील डॉक्टर्स व आरोग्य संस्थांचा सहभाग वाढवला जात आहे. सद्यस्थितीत 10 हजार 607 संस्थांमध्ये हेल्थ रेकॉर्ड लिंकिंगचे काम वेगाने सुरू असून, तब्बल 2.38 कोटी आरोग्य नोंदी डिजिटल स्वरूपात लिंक करण्यात आल्या आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai