Breaking News
राज्य परिवहन महामंडळाचा निर्णय ; पाच लाख देणार
मुंबई : कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या मात्र शासनाच्या निकषात न बसणार्या एसटी कर्मचार्यांच्या वारसांनाही 5 लाखांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
एसटीचा मंगळवारी, 1 जून 2021 रोजी 73 वा वर्धापनदिन पार पडला. महामंडळाच्या मुख्यालयात साधेपणाने छोटेखानी कार्यक्रम पार पडला. यावेळी कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या कर्मचार्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी महामंडळ ठामपणे उभे असून कोरोनामुळे निधन झालेल्या, परंतु शासनाच्या निकषात बसत नाहीत, अशा कर्मचार्यांच्या वारसांना राज्य परिवहन महामंडळाच्या निकषाप्रमाणे 5 लाख रुपयांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी केली. त्याशिवाय कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचार्यांना 50 लाख रुपये देण्याची सरकारी योजनेची मुदत एसटी कर्मचार्यांसाठीही 30 जून 2021 पर्यंत वाढिवण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. महामंडळासमोर कितीही अडचणी आल्या तरी एकाही कर्मचार्याला नोकरी गमवावी लागणार नाही, अशा शब्दात अॅड. परब यांनी कामगारांना आश्वस्त केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai