नवीन 22 लसीकरण केंद्र 16 जूनपासून सुरू

नवी मुंबई ः कोव्हीडच्या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोव्हीड 19 लसीकरणाला अधिक गती मिळावी व नवी मुंबईतील कोणताही नागरिक लसीकरणापासून वंचीत राहू नये याकरिता महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार नवीन 22 लसीकरण केंद्र 16 जूनपासून सुरू करण्यात येत आहेत. याठिकाणी विनामूल्य लसीकरण होणार आहे.

सद्यस्थितीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 34 लसीकरण केंद्रे कार्यान्वित असून नागरिकांना त्यांच्या घरापासून जवळ सहजपणे लस घेता यावी याकरिता आणखी 22 नवीन लसीकरण केंद्रे सुरु करण्यात येत आहेत. यामध्ये आवश्यकतेनुसार आणखी वाढ करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. 

लसीकरण केंद्राचे नाव

 • नमुंमपा शाळा क्र. 24 हनुमान नगर
 • नमुंमपा शाळा क्र. 30 कोपरीगांव
 • नमुंमपा शाळा क्र. 41 अडवली भुतावली
 • नमुंमपा शाळा क्र. 36 कोपरखैरणेगांव
 • नमुंमपा शाळा क्र. 1 बेलापूर गांव सीबीडी
 • नमुंमपा शाळा क्र. 2 दिवाळेगांव, सीबीडी
 • नमुंमपा शाळा क्र. 6 करावेगांव
 • नमुंमपा शाळा क्र. 16 शिवाजीनगर नेरुळ 1
 • नमुंमपा शाळा क्र. 10 नेरुळ 2
 • नमुंमपा शाळा क्र. 12 सारसोळे, कुकशेत
 • नमुंमपा शाळा क्र. 15 शिरवणेगांव, शिरवणे
 • नमुंमपा शाळा क्र. 29 जुहूगांव
 • नमुंमपा शाळा क्र. 27 वाशीगांव
 • नमुंमपा शाळा क्र. 74 सेक्टर 2, कोपरखैरणे, महापे
 • नमुंमपा शाळा क्र. 42 चिंचआळी, घणसोली
 • नमुंमपा शाळा क्र. 46 गोठिवली, नोसिलनाका
 • नमुंमपा शाळा क्र. 91 सेक्टर 7 राबाडा
 • नमुंमपा शाळा क्र. 55/104 कातकरीपाडा
 • नमुंमपा शाळा क्र. 49 ऐरोलीगांव
 • नमुंमपा शाळा क्र. 53 चिंचपाडा
 • नमुंमपा शाळा क्र. 52 दिघा
 • नमुंमपा शाळा क्र. 56 इलठणपाडा