मुंबईसह 12 जिल्ह्यांना अलर्ट
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 14, 2021
- 833
मुंबई : गेल्या आठवड्यापासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. पुण्यासह घाट परिसरात आणि कोकण किनारपट्टीवर तर पावसानं धुमशान घातलं आहे. आजही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा या पाच जिल्ह्यांना हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यांत आज अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
आज पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, जालना, परभणी आणि नांदेड या सात जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या सात जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, 30 ते 40 किमी प्रतितास वेगानं वारा वाहणार आहे. त्यामुळे नागरिकांना लांबचा प्रवास न करण्याचा आणि आकाशात विजा चमकत असताना मोठ्या झाडाखाली आडोशाला न उभं राहण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे. आज राज्यात पाच जिल्ह्यांना रेड तर सात जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai