Breaking News
कोलंबो : टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याला कोरोनाची लागण झाली आहे. कृणालचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याचा थेट परिणाम हा श्रीलंका विरुद्धच्या दुसर्या टी 20 सामन्यावर झाला आहे. कृणाल पॉझिटिव्ह असल्याने ही दुसरी मॅच स्थगित करण्यात आली आहे.
कृणालला कोरोना झाल्याने टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झाली आहे. टीम इंडियाच्या मुख्य संघ इंग्लंड दौर्यावर आहे. या दौर्यात टीम इंडियाचे तीन स्टार खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने त्यांना या कसोटी मालिकेला मुकावे लागले आहे. दुखापतीमुळे शुबमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान यांना मुकावे लागले. त्यामुळे यांच्या जागी मुंबईकर सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ यांची इंग्लंड दौर्यासाठी निवड करण्यात आली आहे. मात्र आता कृणालला कोरोना झाल्याने या दोघांच्या इंग्लंड दौर्याबाबत सांशकता निर्माण झाली आहे.
कृणालला कोरोना झाल्याने टीम इंडिया आणि श्रीलंकेच्या खेळाडूंना आयसोलेट करण्यात आलेय. या उभयसंघातील सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी केली जाणार आहे. सर्व खेळाडूंची टेस्ट नेगिटव्ह आली, तर हा स्थगित केलेला दुसरा सामना बुधवारी 28 जुलैला खेळवला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai